नोकरीची सुवर्णसंधी! रेल्वे विभागात या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असतात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, जगजीवनराम हॉस्पिटल पश्चिम रेल्वे, मुंबई विभागाने एकूण नऊ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेत डॉक्टरची रिक्त पदे भरली जाणार आहेत. ही रिक्त पदे थेट मुलाखतीच्या द्वारे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवाराला मुलाखतीच्यावेळी दिलेल्या ठिकाणी जाणे अनिवार्य आहे.

मुलाखत कधी असेल?

येत्या 15 जानेवारी 2024 रोजी 9 रिक्त पदांसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त 45 वय असावे अशी अट ठेवण्यात आली आहे. 45 पेक्षा अधिक वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार नाही. नोकरीचे ठिकाण देखील मुंबई असेल.

मुलाखत कोठे होणार?

इच्छुक उमेदवारांची मुलाखत ही जगजीवनराम रुग्णालय, सातवा मजला, मुंबई सेंट्रल, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना ही  मुलाखत द्यायची आहे, त्यांनी सकाळी ठीक 9 वाजता दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे. दुपारी 12 नंतर आलेल्या उमेदवारांची कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही.

मुलाखतीला जाणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, आपण नेमकी कोणत्या पदासाठी मुलाखत देत आहोत. जे उमेदवार भरती प्रक्रियेसाठी मुलाखत देणार आहेत त्यांनी 15 जानेवारी ते 2024 रोजी दिलेल्या ठिकाणी मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. या मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळेल.