10 वी पास विद्यार्थ्यांना महावितरणात नोकरीची संधी; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे . महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, वाशीम येथे अप्रेंटीस (कोपा, वीजतंत्री, तारतंत्री) पदांच्या एकूण 75 रिक्त जागा भरल्या जाणार असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज पद्धती ऑनलाईन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, वाशीम
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख- 10 ऑगस्ट 2022
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- 20 ऑगस्ट 2022
नोकरीचे ठिकाण- वाशीम

पद संख्या – 78 जागा

वीजतंत्री – 33 जागा
तारतंत्री – 33 जागा
कोपा – 09 जागा

शैक्षणिक पात्रता-

वीजतंत्री ( इलेकट्रिशिअन )-
सदर उमेदवार 10 वी पास असावा आणि ITI NCVT ( इलेकट्रिशिअन ) असावा.

तारतंत्री- (वायरमन )-
सदर उमेदवार 10 वी पास असावा आणि ITI NCVT ( वायरमन ) असावा.

कोपा-
सदर उमेदवार 10 वी पास असावा आणि ITI NCVT ( कोपा ) असावा.

असा करा अर्ज-

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड वाशीम च्या अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in ला भेट द्या.

खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.

अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.

अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.

अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिकृत वेबसाईटwww.mahadiscom.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा