Red Banana Farming | इंजिनिअरने नोकरी सोडून केली लाल केळीची शेती; कमावतोय लाखो रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Red Banana Farming |आपल्या देशामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. आपल्या देशाची जवळपास 50 टक्के लोकसंख्या शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी नेहमी शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. आजकाल अनेक उच्च शिक्षित तरुण देखील नोकरी न करता शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहत आहेत. आणि वर्षाला त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. पारंपरिक पिकांना बाजूला ठेवून आजकाल तरुणांनी आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेगवेगळे पिके घेण्यास सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी यातून जगासमोर एक मोठा आदर्श देखील निर्माण केलेला आहे.

अशातच आता सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या एका उच्चशिक्षित तरुणाने एक शेतात वेगळा प्रयोग केलेला आहे. याची सर्वत्र सध्या चर्चा झालेली आहे. या तरुणाचे सिविल इंजिनिअरिंग झालेले आहे. त्याने त्याच्या चार एकरात लाल केळीचे (Red Banana Farming) उत्पादन घेतलेला आहे. आणि या केळीच्या पिकातून त्यांनी जवळपास 35 लाख रुपयांची कमाई केलेली आहे.

लाल केळी ही आपल्या सामान्य केळीपेक्षा खूप वेगळी असते. या केळीला जगभरात खूप जास्त मागणी आहे. फाईव्ह स्टारमध्ये तसेच मेट्रोच्या शहरांमध्ये या लाल केळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.या तरुणाने नोकरीच्या मागे न पडता एक वेगळा निर्णय घेतला. आणि चार एकर त्याने 35 लाखाच्या केळीचं पीक पिकवले आहे. त्यामुळे या शेतकरी तरुणाचे सध्या देशभर कौतुक होताना दिसत आहे.

या तरुणाचे नाव अभिजीत पाटील असे आहे. त्याने लाल केळीची लागवड केलेली आहे. उच्चशिक्षित झालेल्या इंजिनियर तरुणांना आजकाल नोकरीचे वेध लागलेले असतात. त्यापासून त्यांना कोणीही लांब करू शकत नाही. परंतु या तरुणाने चांगल्या पगाराचीची नोकरी धुडकावून शेती करण्याचा निर्णय घेतला. अभिजीतने चार एकरामध्ये 60 टन केळीचे उत्पादन घेतलेले आहे. त्याचा खर्च वगैरे काढून त्याला 35 लाख रुपयांचा नफा झालेला आहे.

कुठल्याही बाजारात न विकण्याचा निर्णय | Red Banana Farming

अभिजीत नेत्याचे इंजिनिअरिंगची डिग्री डी वाय पाटील कॉलेज पुणे इथून घेतलेली आहे 2015 साली त्याने शेती करण्याचा निर्णय घेतलेला होता. सात – आठ वर्षात त्यांनी शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग केले. त्यानंतर 2020मध्ये त्याने सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन चार एकरात लाल केळीची शेती केली. परंतु त्याने कुठल्याही बाजारात ही केळी विकली नाही. त्याने त्याचे मार्केटिंग कौशल्य वापरले आणि ही लाल केळी थेट पुणे, मुंबई, दिल्ली आणि येथील रिलायन्स आणि टाटा मॉलमध्ये विकलेली आहे. या लाल केळींना सध्या बाजारात खूप जास्त भाव आहे.

आरोग्यासाठी लाल केळी अधिक फायद्याची

आपल्या सामान्य केळीपेक्षा लाल केळीही आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायद्याची असते. या केळीची साल लाल असते. त्याप्रमाणे त्याचे फळ हे काहीशा प्रमाणात पिवळ्या रंगाचे असते. यामध्ये शुगर देखील मर्यादित असते. ही केळी खाल्ल्याने कॅन्सर तसेच हृदयविकाराचा धोका कमी असतो. त्याचप्रमाणे ही केळी खाल्ल्याने मधुमेह होण्याची शक्यता देखील कमी असते.