हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Red Chequered Highway । मित्रानो, रस्त्यावर प्रवास करत असताना तुम्ही त्यावर पांढरी किंवा पिवळी [पट्टी बघितली असेलच. मात्र आता लाल रंगाने रस्त्यावर निर्देशक आखण्यात आले प्रवाशांमध्ये याबाबत कुतूहल निर्माण झालं आहे. हा लाल पट्ट्यांचा महामार्ग मध्य प्रदेशात उभारण्यात आला आहे. जबलपूर आणि भोपाळ राष्ट्रीय महामार्ग! क्रमांक 45 वर तुम्हाला असे लाल पॅचेस असणारा महामार्ग पाहायला मिळेल. सरकारने प्रथमच असा लाल पट्ट्यांचा महामार्ग का बांधला आहे? यामागे नेमकं कारण काय आहे? हे आपण आज जाणून घेऊया.
वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन- Red Chequered Highway
तर हा लाल चौकोनी पॅचेस असलेला महामार्ग भोपाळ आणि जबलपूर दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग ४५ चा ११.९६ किमी लांबीचा हिरण-सिंदूर विभाग नौरादेही वन्यजीव अभयारण्य आणि वीरंगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्पातून जातो. हा महामार्ग थेट जंगलातून जातो, त्यामुळे त्याठिकाणच्या वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. जेणेकरून प्राण्यांना त्यांच्या अधिवासात कमीत कमी अडथळा येता येईल आणि रस्त्याखाली सुरक्षितपणे फिरता येईल. अहवालांनुसार, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मार्गावर २५ अंडरपास बांधले आहेत .Red Chequered Highway
मध्य प्रदेशातून जाताना हा महामार्ग वीरंगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पातून जातो. तो नौरादेही वन्यजीव अभयारण्यातूनही जातो. कोल्हे आणि हरीण यांसारखे प्राणी पूर्वी अनेकदा या वर्दळीच्या रस्त्यावरून जाताना दिसायचे. अशावेळी भरधाव गाडी थेट प्राण्यांना टक्कर देऊ नये यासाठी हि आयडियाची कल्पना करण्यात आली आहे. रस्त्यावरील लाल रंगाचे टेबलटॉप मार्किंग वाहनचालकांना इशारा देतात की ते वन्यजीवांच्या क्षेत्रात प्रवेश करत आहेत, त्यामुळे गाडीचा वेग हा कमी करावा. महत्वाची गोष्ट म्हणजे हा लाल रंगाच्या रंगीत पट्ट्या पाच मिलीमीटर जाडीच्या आहेत. आणि थोड्या उंचावर आहेत, ज्यामुळे चालकांना त्यावरून गाडी चालवताना थोडासा धक्का जाणवतो आणि गाडीचे स्पीड कमी करण्यास ते चालकांना प्रवृत्त करतो. अधिकृत प्रकल्प अहवालात असेही नमूद केले आहे की आजूबाजूच्या वन्यजीव क्षेत्रांचे पुनर्वर्गीकरण केल्यानंतर अपग्रेड केलेल्या महामार्गामुळे पर्यटन आणि महसूल वाढेल अशी अपेक्षा आहे




