Redmi A3 : Redmi ने लाँच केला स्वस्तात मस्त मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Redmi A3 : स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करण्याला सर्वचजण पसंती देत असतात. कमी पैशात जास्तीत जास्त फीचर्स असलेला मोबाईल घेण्याकडे ग्राहकांचा कल पाहायला मिळतो. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन प्रसिद्ध मोबाईल कंपनी Redmi ने सर्वसामन्याला परवडेल अशा किमतीत नवा मोबाईल लाँच केला आहे. Redmi A3 असे या मोबाईलचे नाव असून तुम्ही अवघ्या 7,299 रुपयांत हा मोबाईल खरेदी करू शकता. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

Redmi A3 मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.71-इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1650 x 720 पिक्सेल रिझोल्युशन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 संरक्षण मिळते. या स्मार्टफोनमध्ये 2.2 GHz ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ G36 12nm प्रोसेसर बसवण्यात आला असून रेडमीचा हा मोबाईल Android 13 वर काम करतो.

कॅमेरा – Redmi A3

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचे झाल्यास, Redmi A3 च्या पाठीमागील बाजूला 8MP AI ड्युअल कॅमेरा उपलब्ध असून समोरीलबाजूला सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi A3 मध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 10W USB टाइप C चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने हा स्मार्टफोन 3GB RAM + 64GB स्टोरेज, 4GB RAM + 128GB स्टोरेज आणि 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये लाँच केला असून त्यानुसार त्याची किंमतही वेगवेगळी आहे.

किंमत किती-

Redmi A3 च्या 3GB + 64GB मॉडेलची किंमत 7,299 रुपये आहे. 4GB + 128GB व्हेरिएन्टची किंमत 8,299 रुपये आणि टॉप व्हेरिएन्ट असलेल्या 6GB + 128GB मॉडेलची किंमत 9,299 रुपये आहे.