Redmi Note 14S: 200MP कॅमेरा, अन 5000mAh बॅटरीसोबत Redmi Note 14S लाँच; पहा किंमत

Redmi Note 14S
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Redmi Note 14S – Redmi ने आपला नवीन स्मार्टफोन Redmi Note 14S लाँच केला आहे. हा फोन कंपनीच्या लोकप्रिय Note सीरिजमधला एक नवीन आणि शक्तिशाली स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 200MP प्राइमरी रियर कॅमेरा, 6.67 इंच AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी सारखे दमदार फीचर्स आहेत. रेडमी नोट 14S मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे , यामुळे हा फोन अजून आकर्षक बनला आहे. तर चला या भन्नाट फीचर्सच्या फोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Redmi Note 14S चे फीचर्स –

डिस्प्ले आणि वजन – रेडमी नोट 14S मध्ये 6.67 इंचाची फुलएचडी+ (1,080×2,400 पिक्सल) AMOLED स्क्रीन आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. तसेच, स्क्रीनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन दिले गेले आहे. फोनचे डाइमेंशन 161.1×74.95×7.98 मिमी आहे आणि वजन 179 ग्रॅम आहे.

प्रोसेसर – या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G99-Ultra चिपसेट आहे. यामुळे फोनला उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि गेमिंग अनुभव मिळतो.

रॅम आणि स्टोरेज – रेडमी नोट 14S मध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजचा पर्याय आहे, ज्यामुळे तुम्हाला अधिक डेटा एका ठिकाणी ठेवता येतो.

कॅमेरा सेटअप – फोनमध्ये 200 मेगापिक्सल प्राइमरी रियर कॅमेरा आहे, ज्यामुळे तुमच्या फोटोंचा अनुभव चांगला होतो . याशिवाय, 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे अल्ट्रावाइड आणि मॅक्रो कॅमेरे दिले गेले आहेत. फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे.

बॅटरी आणि चार्जिंग – रेडमी नोट 14S मध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे तुम्हाला कमी वेळात अधिक बॅटरी चार्ज करता येते.

कनेक्टिविटी – कनेक्टिविटीसाठी 4G LTE, वाई-फाई, ब्लूटूथ 5.2, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट सारखे फीचर्स आहेत. तसेच फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि P64 रेटिंगच्या सुरक्षा फीचर्स आहे.

किंमत –

रेडमी नोट 14S स्मार्टफोन सध्या चेक रिपब्लिकमध्ये 5,999 CZK (सुमारे 22,700 रुपये) मध्ये उपलब्ध आहे. यूक्रेनमध्ये देखील हा फोन खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ऑरोरा पर्पल, मिडनाइट ब्लॅक आणि ओशन ब्लू या तीन रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.