Redmi Pad Pro 5G टॅबलेट लाँच; मिळते 10,000 mAh बॅटरी, किंमत किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल ब्रँड Xiaomi ने भारतीय बाजारपेठेत एक नवीन टॅब लाँच केला आहे. Redmi Pad Pro 5G असं या टॅबलेटचे नाव असून यामध्ये तब्बल 10,000 mAh बॅटरी ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. हा टॅब एकूण २ स्टोरेज व्हेरिएन्टमध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किंमतही वेगवेगळी आहे. Redmi Pad Pro 5G च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे तर 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. येत्या 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता हा टॅबलेट विक्रीसाठी उपलब्ध होईल. आज आपण Xiaomi च्या या नव्या टॅबचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात…

Redmi Pad Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 12.1 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 600 Nits पीक ब्राईटनेस आणि स्क्रीन प्रोटेक्शन मिळतेय. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये Snapdragon 7s Gen 2 चिपसेट वापरली आहे. त्यानुसार टॅबलेट मध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएन्ट असे २ पर्याय दिले आहेत. हा टॅबलेट Xiaomi HyperOS Android 14 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो.

Redmi Pad Pro 5G च्या कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचं झाल्यास यामध्ये पाठीमागील बाजूल 8MP चा मुख्य कॅमेरा आहे, तर समोरील बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. खास बाब म्हणजे या टॅबलेटची बॅटरी, कारण यामध्ये तब्बल 10,000mAh बॅटरी बसवण्यात आली आहे. ही बॅटरी 33W वायर चार्जिंगला सपोर्ट करत असून कंपनीचा दावा आहे की हा मोबाईल 12 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो. टॅबलेट मध्ये क्वाड स्पीकर सेटअप आहे, जो डॉल्बी ॲटमॉस सपोर्ट, WiFi 6, GPS आणि Bluetooth v5.2 यांसारखे फीचर्स मिळतात.

किंमत किती? Redmi Pad Pro 5G

Redmi Pad Pro 5G च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. या टॅब्लेटची विक्री 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. टॅबलेट खरेदीवर कंपनीने काही बँक ऑफर देखील दिल्या आहेत, ज्यामध्ये यूजर्सना 2 हजार रुपयांची सूट मिळू शकते. यासाठी तुम्ही ICICI बँक आणि HDFC बँक कार्ड वापरू शकता.