Reduce Electricity Bill Device : कितीही फॅन वापरला तरी लाईट बिल येईल कमी; फक्त घरात बसवा ‘हे’ उपकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Reduce Electricity Bill Device) आता उन्हाळा सुरु झाल्यामुळे वातावरणात आपोआप उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात गरमी इतकी वाढते की घराघरात दिवस- रात्र पंखे, एसी, कुलर चालू असतात. सतत पंखा चालू असल्यामुळे त्याच्या पातींवर धूळ साचते आणि यामुळे पंखा जास्त स्पीडवर ठेवल्यास लाईट बील जास्त येतं. असा एक सर्वसामान्य समज आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ही विद्युत उपकरणे अधिक प्रमाणात वापरली गेली की, साहजिकपणे विजेच्या बिलाचा आकडा वाढतो.

(Reduce Electricity Bill Device) बरेच लोक असं सांगतात की, पंख्याचा स्पीड कमी ठेवला तर लाईटबील कमी येत. पण मुळात यामध्ये तथ्य आहे का? यामुळे खरंच बिल कमी येतं का? तर मित्रांनो यामागे एक ट्रिक आहे. एक असं उपकरण बाजारात उउपलब्ध आहे ज्याच्या सहाय्याने तुम्ही खरोखरचं विजेची आणि तुमच्या पैशांची बचत करू शकता. आता ते उकररण कोणतं आणि त्याचा वापर कसा केला जातो? याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.

‘अशी’ करता येईल विजेची बचत

पंख्याचा स्पीड कंट्रोल केल्याने वीज बचत होते असं तुम्ही बऱ्याच लोकांकडून ऐकलं असेल. तर मित्रांनो, ही बाब खरोखरचं खरी आहे. पंख्याचा स्पीड कंट्रोल करून आपण लाईटबील कमी करू शकतो. बाजारात विविध प्रकारचे, विविध डिझाईनचे फॅन उपलब्ध असतात. यापैकी आपण आपल्या घरात साजेसे पंखे लावून घेतो. (Reduce Electricity Bill Device) मात्र, पंख्याचा स्पीड कंट्रोल करणारे रेग्युलेटरसुद्धा २ प्रकारचे असतात याबाबत फार कमी लोकांना माहित आहे. यापैकी एक रेग्युलेटर पंख्याच्या स्पीडसोबत त्याच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेवर कंट्रोल करतो. तर पंख्याचा स्पीड कमी केल्यास विजबिल देखील आटोक्यात येते. मात्र याऐवजी तुम्ही जर दुसऱ्या रेग्युलेटरची निवड केली तर विजेची बचत अशक्य आहे.

विजेची बचत करणारा इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर (Reduce Electricity Bill Device)

पंख्याचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी एका खास इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरचा वापर केल्यास विजेचा जास्त वापर टाळता येतो. कारण, असे रेग्युलेटर विजेचा अधिक वापर करत नाहीत. या रेग्युलेटरची साइज नॉर्मल रेग्युलेटर पेक्षा थोडी मोठी असते आणि सर्वसामान्य रेग्युलेटरपेक्षा हे रेग्युलेटर जरा महाग असतात. याच्या वापराने एकतर विजेची बचत होते आणि परिणामी पैशांची देखील बचत होते.

हे रेग्युलेटर कुठे मिळतील?

यंदाच्या उन्हाळ्यात जर वीजबिल कमी करायचे असेल तर इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरला ओपन मार्केटमधून खरेदी करा आणि घरात बसवा. आपल्याला ओपन मार्केटमध्ये हे रेग्युलेटर सहज मिळतात. मात्र, शोधूनही सापडले नाहीत तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सर्च करून आपण हे इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर ऑनलाईन स्वरूपात खरेदी करू शकतो. याचा वापर केल्यामुळे विजेची अधिक काळ बचत होईल. कारण सर्वसामान्य रेग्युलेटर पेक्षा हे रेग्युलेटर जास्त काळ टिकतात. (Reduce Electricity Bill Device)