Wednesday, June 7, 2023

त्या ’56’ फिटनेस प्रमाणपत्राबाबत अधिकाऱ्यांचा हॅलो महाराष्ट्रकडे खुलासा…

सातारा | सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 56 बेकायदेशीर फिटनेस संदर्भात बातमी प्रकाशित केली यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी लेखी खुलासा केला असून, यामध्ये हँलो महाराष्ट्रने प्रकाशित केलेल्या त्या फिटनेस संदर्भात दिनांक 7 सप्टेंबर 2021 रोजी कार्यालयीन कर्मचारी यांच्या कामकाजाचे पूर्वीच्या निर्गमित आदेशामध्ये बदल करून सुधारित आदेश निर्गमित केले आहेत. तोपर्यंत तत्कालीन नियंत्रक अधिकारी यांचे आदेशान्वये कामकाज पार पडले जात होते. त्यामुळे बातमीमध्ये दर्शविलेल्या कामासाठी तत्कालीन आदेश लागू असल्याचे म्हटले आहे. तसेच दिनांक 7 सप्टेंबर 2021 रोजी पूर्वीच्या आदेशात कोणताही बदल केला नव्हता, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.

तसेच माहे सप्टेंबर 2021 मध्ये परिवहन आयुक्त यांच्या आदेशानुसार फिटनेस प्रमाणपत्र कामासाठी ना हरकत जारी करणे तसेच इतर कार्यालयातून आलेल्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी पुढील कारवाई करणे किंवा कार्यालयीन अभिलेखा वरील वाहनांना इतर राज्यात फिटनेस प्रमाणपत्रासाठी ना हरकत देणे व त्यापुढील कारवाई करणे बाबत तस्यम कामकाज हे कार्यालय प्रमुख यांच्या पूर्व परवानगीने करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. यामुळे माहे सप्टेंबर 2021 च्या आदेशापूर्वी अशा प्रकारचे कामकाज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.