Farmer ID Card: घरबसल्या करा शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

0
7
Farmer ID Card
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Farmer ID Card| संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्राची नोंदणी (Farmer ID Card Resignation) करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शेतीविषयक अनुदान, कर्जसुविधा आणि विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळावा यासाठी सरकारने ही प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे, ही नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन असून शेतकरी घरी बसूनही अर्ज करू शकतात.

शेतकरी ओळखपत्राचे महत्त्व (Farmer ID Card)

शेतकरी ओळखपत्र सरकारी योजनांसाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. या ओळखपत्राच्या मदतीने शेतकरी अनुदान, पीक विमा, शेतीविकास योजना आणि अन्य सरकारी मदतीसाठी थेट पात्र ठरतात. यामुळे अनुदान प्रक्रिया जलद होते आणि पारदर्शकता राहते. तसेच, कर्जप्रक्रियेतही हे ओळखपत्र उपयुक्त ठरणार आहे. डिजिटल स्वरूपात असलेले हे ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

शेतकऱ्यांना हे ओळखपत्र काढण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यात आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते तपशील, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, पत्ता पुरावा आणि सक्रिय मोबाइल क्रमांक या कागदपत्रांचा समावेश आहे. तसेच, पासपोर्ट आकाराचा फोटोही अपलोड करावा लागेल. सर्व कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे.

कोण अर्ज करू शकतो?

शेतकरी ओळखपत्रासाठी (Farmer ID Card) अर्ज करणारा व्यक्ती भारताचा रहिवासी असावा. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे.

ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कशी करावी?

शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अधिकृत पोर्टलला भेट द्यावी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी AgriStack पोर्टल (https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/) उपलब्ध आहे.

१. प्रथम संकेतस्थळावर “नवीन खाते तयार करा” या पर्यायावर क्लिक करा.
२. आधार क्रमांक टाकून ओटीपी पडताळणी करा.
३. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी नोंदणी करून पासवर्ड तयार करा.
४. लॉगिन करून “शेतकरी म्हणून नोंदणी करा” या पर्यायावर क्लिक करा.
५. आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा.
६. “ई-साइन” प्रक्रिया पूर्ण करून अर्ज सबमिट करा.

अर्ज यशस्वीपणे सबमिट केल्यानंतर, अर्जदाराला नोंदणीची पावती मिळेल. हे पावती डाऊनलोड करून आपल्याजवळ ठेवावी.