Rekha Birthday : खरंच रेखाचं अमिताभ बच्चन यांच्यासोबत अफेअर होतं? जाणून घ्या खास किस्से

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री रेखा हिचा आज वाढदिवस (Rekha Birthday) आहे. कधीकाळी बॉलिवूड गाजवणारी रेखा आता ६८ वर्षांची झाली आहे. रेखाने एकापेक्षा एक असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आपल्या अभिनयामुळे रेखाने चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज आपण रेखाच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दल अशा काही गोष्टी जाणून घेऊयात ज्या बाबत तुम्ही यापूर्वी कधीच ऐकले नसेल.

10 ऑक्टोबर 1954 रोजी चेन्नईमध्ये जन्मलेली रेखा कायमच प्रसिद्धीची झोत्यात राहिली आहे. आज रेखा तिचा 68 वा वाढदिवस साजरा करत आहे. रेखाने खूप कमी वयात प्रसिद्धी आणि नाव असं दोन्ही कमावलं होत. मात्र जेव्हा नाव अन प्रसिद्धी येते तेव्हा त्यासोबतच अफवाही पसरतात. रेखाही याला काही अपवाद नाही. रेखाचं नाव अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेकवेळा जोडलं जात. पण खरंच अमिताभ यांचं रेखासोबत अफेअर होतं काय? चला जाणून घेऊयात.

अमिताभ बच्चन यांच्याशी रेखाचे अफेअर? (Rekha Birthday)

लोकप्रिय अभिनेत्री रेखाने बॉलिवूडमधील सर्व दिग्गज अभिनेत्यांसोबत चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु आजही लोक तिचे अमिताभ बच्चनसोबतचे अफेअर विसरलेले नाहीत. अमिताभ अन रेखा या दोघांनीही कधीच याविषयावर उघडपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. असे असले तरी त्यांच्या प्रेमप्रकरणाची बरीच चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर रेखाला अजूनही अमिताभ बच्चन आवडतात, असे दोघांच्या चाहत्यांना वाटते.

रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यातील ऑन-स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. अफवांनुसार, दो अंजानेच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम सुरू झाले. त्यावेळी रेखा आणि अमिताभ यांच्या चर्चा प्रत्येक वृत्तपत्र आणि मासिकात पाहायला मिळत होत्या. या दोघांनी जेव्हा त्यांचा पहिला चित्रपट एकत्र केला तेव्हा 2022 पर्यंत त्यांच्या प्रेमाच्या कहाण्या लक्षात राहतील याची कल्पनाही केली नसेल. Rekha Birthday

रेखाने एका मुलाखतीत सांगितले होते की, दो अंजानपूर्वी अमिताभ यांची प्रतिमा दिवार चित्रपटातून सुपरस्टार अशी झाली होती. त्यामुळे रेखाला त्याच्यासोबत काम करताना थोडा नर्व्हसपणा वाटायचा. मात्र त्यानंतर रेखा अन अमिताभ या जोडीने बॉलीवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले.