हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशातील दिग्गज रिलायन्सने आपल्या रिलायन्स डिजिटल प्लॅटफॉर्मवर लोकांचा वावर लक्षात घेऊन एक नवीन लॅपटॉप (LAPTOP) लॉन्च केला आहे. हा नवीन लॅपटॉप मोबाईल सिमलाही सपोर्ट करणार आहे.
लॅपटॉपमध्ये सिम कार्ड लावता येणार
लोकांच्या गरजा लक्षात घेऊन रिलायन्स डिजिटलने HP च्या सहकार्याने सिमकार्ड असलेला लॅपटॉप (LAPTOP) लॉन्च केला आहे, ज्याद्वारे लोक इतरत्र कुठेही नाही तर त्यांच्या सिम कार्ड स्लॉटमधून सिमकार्ड टाकून इंटरनेटचा आनंद घेऊ शकतील.
हा HP लॅपटॉप फक्त रिलायन्सवर उपलब्ध
कंपनीने जारी केलेल्या बॅनरनुसार हे लॅपटॉप (LAPTOP) फक्त रिलायन्स डिजिटलवर उपलब्ध आहेत. हा नवीन लॅपटॉप 4G सिमला सपोर्ट करेल. तसेच कंपनीकडून HDFC कार्डच्या माध्यमातून हा लॅपटॉप खरेदी केला तर त्या खरेदीवर ₹ 1500 चा कॅशबॅक देखील दिला जाणार आहे.
100 GB डेटा मोफत, लॅपटॉपची किंमत
कंपनीने खरेदीदारांना मोफत डेटा देखील दिला आहे. त्याच लॅपटॉपच्या किंमतीबद्दल सांगायचे तर, कंपनीने हा लॅपटॉप फक्त ₹ 44000 च्या रेंजपासून सुरू केला आहे. लॅपटॉपमध्ये (LAPTOP) I3 आणि I5 प्रोसेसर दोन्ही पर्याय आहेत. ग्राहक त्यांच्या गरजेनुसार आपला लॅपटॉप निवडू शकतात.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!