रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ; कंपनीने गाठला 1756 चा उच्चांक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्सने १७५६ चा उच्चांक गाठला आहे. यापूर्वी कंपनीचे शेअर्स २७५५ च्या टप्प्यावर होते. त्यामुळे कंपनीने गाठलेला उच्चांक आजवरचा सर्वांत मोठा आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्री ने हा उच्चांक गाठण्याची अनेक वेगवेगळी कारणे सांगण्यात येत आहेत.

यामधलेच पहिले कारण म्हणजे, नुकतीच कंपनीने विलीनीकरणाची घोषणा केली आहे. आता रिलायन्स कंपनीपासून जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विलीनीकरण करण्यात येत आहे. हे १ जुलैपासून लागू झालं असून २० जुलैपासून त्याची रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. हितेश कुमार सेठी एमडी आणि सीईओ म्हणून नवीन युनिटची जबाबदारी स्वीकारतील. RSIL बोर्डाने राजीव महर्षी, सुनील मेहता आणि बिमल मनु तन्ना यांची 6 जुलै 2028 पर्यंत पाच वर्षांच्या कालावधीसाठी अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे.

विशेष म्हणजे, या घोषणेनंतर रिलायन्सच्या बाजारमूल्यातही जोरदार वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ही वाढ थेट १८ लाख कोटी रुपयांच्या पुढे आहे. परंतु  या सगळ्यात जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्सची किंमत किती असेल हे अद्याप कंपनीने सांगितले नाही. मात्र या सगळ्याचा मुकेश अंबानींना चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येत आहे.