हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स आज 52 आठवड्यांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचले. आजच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान, कंपनीच्या शेअर्समध्ये 3.63 टक्क्यांपर्यंत घसरले असून , यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजला 56 हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. या घसरणीमुळे बाजारपेठेत कंपनीच्या भविष्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे, आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. शेअर बाजारातील हे चढ-उतार भविष्यातील आर्थिक परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात परिणाम करू शकतात.
कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण –
बीएसईच्या आकडेवारीनुसार, रिलायन्सचे शेअर्स 1164 रुपयांवर व्यवहार करत होते. गेल्या आठवड्यात कंपनीचे शेअर्स 1199.60 रुपयांवर बंद झाले होते, तर आज शेअर बाजार उघडल्यानंतर रिलायन्सचे शेअर्स 1209.80 रुपयांवर होते. पण , त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र दिसून आले . कंपनीला यामुळे 56 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी कंपनीचे मार्केट कॅप 16,23,343.45 कोटी रुपये होते. पण , आज ट्रेडिंग सत्रात कंपनीचे मार्केट कॅप 15,67,371.49 कोटी रुपयांवर घसरले आहे, ज्यामुळे 55,971.96 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
गुंतवणूकदारांना सल्ला –
शेअर बाजारातील चढ उतारामुळे गुंतवणूकदारांना यासंदर्भात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. शेअर बाजार, क्रिप्टो मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते, त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी वित्तीय सल्लागाराची मदत घेणे आवश्यक आहे. नाहीतर मोठे नुकसान सहन करावे लागते.