रिलायन्स ही गुजराती कंपनी आहे, ती कायम गुजरातीच राहिल; मुकेश अंबानींचे वक्तव्यं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “रिलायन्स ही गुजराती कंपनी आहे आणि ती कायम गुजराती राहील” असे वक्तव्य रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केले आहे. आजपासून गांधीनगर येथे सुरू झालेल्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 मध्ये मुकेश अंबानी बोलत होते. यावेळी त्यांनी मोठी घोषणा देखील केली आहे. मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे की, पुढील 10 वर्षे राज्यात रिलायन्सची गुंतवणूक सुरू राहील, 2030 पर्यंत गुजरातच्या एकूण हरित ऊर्जेच्या वापरापैकी निम्मी ऊर्जा अक्षय ऊर्जेद्वारे निर्माण होईल”

व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 मध्ये बोलताना, “गुजरात ही माझी मातृभूमी आणि कर्मभूमी आहे. रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम राहील. रिलायन्सने आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी एक तृतीयांश गुंतवणूक गुजरातमध्ये केली आहे. आम्ही 7 कोटी गुजरातवासीयांची स्वप्नं पूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही” असे आश्वासन मुकेश अंबानी यांनी दिले.

यानंतर मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान आहेत, ‘मोदी है तो मुमकिन है’. जेव्हा पंतप्रधान मोदी बोलतात तेव्हा जग केवळ त्यांचे ऐकत नाही तर त्यांचे कौतुकही करते पंतप्रधान मोदी अशक्य गोष्ट शक्य करत आहेत” असे देखील म्हटले.

दरम्यान, आजपासून सुरू झालेल्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 मध्ये देशभरातील अनेक मोठ्या उद्योगपतींनी हजेरी लावली होती. या समेटमध्ये गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बहुतांश उद्योगपतींनी मोठी बोली लावली आहे. या समेटमध्येच “2030 पर्यंत गुजरातच्या उर्जेच्या निम्म्या गरजा अक्षय ऊर्जेद्वारे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करेल” अशी मोठी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे.