Reliance Jio ने इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 (IMC 2024) मध्ये दोन नवीन 4G फीचर फोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फीचर फोन V3 आणि V4 4G फीचर फोन Jio भारत सीरीज अंतर्गत लॉन्च करण्यात आले आहेत. नवीन मॉडेल्स 1099 रुपये किमतीत बाजारात दाखल होतील. गेल्या वर्षी कंपनीने Jio Bharat V2 मॉडेल लाँच केले होते. या फोनने लॉन्च झाल्यानंतर लगेचच भारतीय फीचर फोन बाजारात खळबळ उडवून दिली होती. कंपनीचा दावा आहे की लाखो 2G ग्राहक JioBharat फीचर फोनद्वारे 4G नेटवर्ककडे वळले आहेत.
1000 mAh बॅटरी आणि 123 रुपयांमध्ये मासिक रिचार्ज
नवीन नेक्स्ट जनरेशन 4G फीचर फोन नवीनतम डिझाईन, 1000 mAh पॉवरफुल बॅटरी, 128 GB पर्यंत वाढवता येण्याजोगा स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला आहे. हा फीचर फोन 23 भारतीय भाषांना सपोर्ट करतो. Jio Bharat फोन फक्त 123 रुपयांमध्ये मासिक रिचार्ज केला जाऊ शकतो. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि 14 जीबी डेटाची सुविधा मिळेल.
या सुविधाही उपलब्ध असतील
Jio भारत सीरीज अंतर्गत सादर केलेले V3 आणि V4 दोन्ही मॉडेल Jio-TV, Jio-Cinema, Jio-Pay आणि Jio-Chat सारख्या काही सर्वोत्तम प्री-लोड ॲप्ससह बाजारात येतील. 455 हून अधिक लाइव्ह टीव्हीसोबतच या फोनमध्ये एका क्लिकवर ग्राहकांना चित्रपट, व्हिडिओ आणि स्पोर्ट्स कंटेंटही मिळेल.
दुसरीकडे, JioPay सुलभ पेमेंट ऑफर करते आणि JioChat अमर्यादित व्हॉइस मेसेजिंग, फोटो शेअरिंग आणि ग्रुप चॅट पर्याय ऑफर करते.
कुठून खरेदी करता येणार ?
JioPay ला UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) शी जोडले गेले आहे, त्यात एक साउंड बॉक्स देखील आहे. हे डिजिटल पेमेंट सहज करण्यास मदत करते. Jio Bharat V3 आणि V4 लवकरच सर्व मोबाईल स्टोअर्स तसेच JioMart आणि Amazon वर उपलब्ध होतील.