Reliance Jio : रिलायन्स इंडस्ट्रीजची दूरसंचार कंपनी जिओने SBI आणि LIC सारख्या सरकारी कंपन्यांचा पराभव केला आहे. जिओ हा भारतातील सर्वात मजबूत ब्रँड बनला आहे. 2024 मध्ये Jio सर्वात मजबूत भारतीय ब्रँड म्हणून उदयास आला आहे. ब्रँड फायनान्सने जारी केलेल्या ‘ग्लोबल-500 2024’ अहवालात ही माहिती समोर आली आहे.
जिओला मिळाले १७ वे स्थान
ब्रँड फायनान्सने जारी केलेल्या ‘ग्लोबल-500 2024’ अहवालानुसार, ब्रँड फायनान्सच्या 2023 रँकिंगमध्ये Jio (Reliance Jio) हा भारतातील सर्वात मजबूत ब्रँड होता.या वर्षीच्या रँकिंगमध्ये, WeChat, YouTube, Google, Deloitte, Coca-Cola आणि Netflix यांच्या नेतृत्वाखालील यादीत Jio 88.9 च्या ब्रँड सामर्थ्य निर्देशांकासह जगातील सर्वात मजबूत ब्रँडमध्ये 17 व्या स्थानावर आहे.
LIC 23 व्या स्थानावर
याशिवाय या यादीत LIC 23 व्या स्थानावर (Reliance Jio)आहे. यानंतर SBI 24 व्या स्थानावर आहे. ते EY आणि Instagram सारख्या ब्रँडच्या पुढे आहे. अहवालात म्हटले आहे की तुलनेने नवीन जिओ टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मजबूत ब्रँड म्हणून उदयास आला आहे. 89.0 च्या उच्च ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स स्कोअरसह आणि संबंधित AAA ब्रँड रेटिंगसह, त्याचे ब्रँड मूल्य लक्षणीय 14 टक्क्यांनी वाढून $6.1 अब्ज झाले आहे.
या कंपन्या टॉप-3 मध्ये आहेत
या यादीत WeChat पहिल्या स्थानावर आहे. याशिवाय यूट्यूब दुस-या तर गुगल तिसर्या (Reliance Jio) क्रमांकावर आहे.
2016 मध्ये झाली होती जिओची सुरुवात (Reliance Jio)
रिलायन्सने 2016 मध्ये जिओची सुरुवात केली होती. तेव्हापासून कंपनी सातत्याने यशाच्या नवीन शिखरांना स्पर्श करत आहे. जिओ सध्या टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.