हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ चांगलीच वाढली आहे. दिसायला अतिशय आकर्षक आणि महत्वाचे म्हणजे पेट्रोल- डिझेलचा खर्च वाचत असल्याने अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत असतात. ग्राहकांची वाढती मागणी पाहून अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात उतरवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Renault ने नवीन इलेक्ट्रिक हॅचबॅक कार बाजारात आणली आहे. Renault Alpine A290 असं या कारचे नाव असून एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार तब्बल ३८०KM रेंज देण्यास सक्षम आहे. आज आपण या गाडीचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत जाणून घेऊयात…..
380 KM रेंज – Renault Alpine A290
Renault Alpine A290 ही नवीन इलेक्ट्रिक कार 5 E-Tech वर आधारित आहे. ही इलेक्ट्रिक कार ४ ट्रिम ऑप्शन मध्ये सादर करण्यात आली असून कारची GT आणि GT प्रीमियम मधील फ्रंट-माउंट इलेक्ट्रिक मोटर 174 bhpपॉवर आणि 284 Nm टॉर्क जनरेट करते. तर, GTS आणि GT परफॉरमेंस मध्ये 215 bhp पॉवर आणि 300 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इलेक्ट्रिक कारमध्ये 52 kWh बॅटरी बसवण्यात आली असून कंपनीचा दावा आहे की एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हि कार सुमारे 380 किलोमीटर अंतर आरामात पार करू शकतात. कंपनीचा दावा आहे ही कार अवघ्या 6 सेकंदात 0 ते 60kmph चे स्पीड पकडेल.
अन्य फीचर्स –
Renault च्या या इलेक्ट्रिक कारचे डिझाइन स्पोर्टी लूकमध्ये आहे. Alpine A290 मध्ये बसवलेले स्टीयरिंग व्हील फॉर्म्युला 1 कारसारखेच आकर्षक असेल. कार मध्ये 19 इंच टायर मिळतात. 0.25 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.1 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट, चार्जिंग पॉइंट यासारखे फीचर्स मिळतात. इंफोटेनमेंट स्क्रीन ड्रायव्हरच्या डिजिटल नेव्हिगेशन क्लस्टरशी कनेक्ट केली जाऊ शकते. याशिवाय इन्फोटेनमेंट स्क्रीनसह गुगलच्या अनेक सेवाही दिल्या जातील. यात वायरलेस मोबाइल चार्जिंग, फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील असलेले कॉकपिट यांसारखे अनेक खास वैष्टिष्ट्ये मिळतात. कारच्या किमतीबाबत सांगायचं झालयास, Alpine A290 ची किंमत ३५ लाखच्या आसपास राहू शकते.