एक मधुर आवाज हरपला!! सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे शनिवारी पहाटे पुण्यात निधन झाले आहे. त्यांची वयाच्या 92 व्या वर्षी प्राणज्योत मावळली आहे. आज पहाटे प्रभा अत्रे यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी वाटेत त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर डॉक्टरांनी प्रभा अत्रे यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांना दिली.

प्रभा अत्रे यांना भारत सरकारचे तीनही पद्य पुरस्कार मिळाले होते. त्या एक सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका होत्या. प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला. लहानपणापासूनच प्रभा अत्रे यांना संगीताची आवड होती. त्यामुळे त्यांनी संगीत क्षेत्रात रस दाखवत आपल्या मित्राच्या सांगण्यावरून राग, वाद्य याचे धडे घेण्यास सुरुवात केली. इथूनच त्यांचा संगीतमय प्रवास सुरू झाला आणि त्यांनी संगीत क्षेत्रात नाव देखील कमवले.

प्रभा अत्रे यांनी गुरु शिष्य परंपरेतून संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकले. खास गोष्ट म्हणजे प्रभा अत्रे या संगीत क्षेत्राबरोबर नृत्य क्षेत्रामध्ये देखील अवगत होत्या. त्यांनी कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. संगीत शिकत असताना त्यांनी पुण्यातील फरगुशन कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी देखील मिळवली. यानंतर त्यांनी लॉ कॉलेजमधून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले.

संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे प्रभा अत्रे यांना भारत सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे तीनही पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. प्रभा अत्रे यांचा आवाज त्यांच्या प्रेक्षकांना मंत्रमुक्त करून सोडणारा होता. त्यांची शास्त्रीय संगीतावरील पकड नेहमी त्यांच्या कार्यक्रमांमधून दिसून येत होती. आज याच प्रभा अत्रे यांच्या निधनाची बातमी आल्यामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.