Rental House At Pune : पुण्यात स्वस्तात भाड्याने घर पाहिजे? ‘ही’ 6 ठिकाणे तुमच्यासाठी ठरतील बेस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Rental House At Pune : पुणे शहराची ओळख देशातील महत्वाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक शहर अशी आहे. पुणे शहर शैक्षणिक, औद्योगिक आणि आयटी हब यांचे केंद्रस्थान आहे. साहजिकच पुण्यामध्ये देशातील अनेक राज्यांतून विद्यार्थी, कामगार, तंत्रज्ञ, कलाकार इ. लोकांचा ओघ आहे. पुण्यात सध्या यामुळे लोकसंख्या वाढत आहे. राहायला येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पुण्यालगत औद्योगीकरणाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. पिंपरी – चिंचवड, चाकण एमआयडीसी, शिक्रापूर रस्ता, हिंजवडी या परिसराकडे पुणे महानगरी व्यापक होत चालली आहे. पुण्यालगत या क्षेत्रात आयटी हबचा विस्तार झाल्याने अनेक तरुणांचा ओघ पुण्यात राहण्यासाठी येत आहे. नोकरदार, विद्यार्थी पुण्यात राहण्यासाठी पसंती देत असल्याने पुण्यात रियल इस्टेटचा व्यवसाय वाढला आहे. त्या त्या गटांतील लोकांसाठी भाड्याची घरे पुण्यात मिळत आहेत.

सद्यस्थितीत भाड्याच्या घरांचा शोध खूप जण घेत असतात. पुण्यातील भाड्याच्या घरांचा शोध मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे दिसते. लोक जसजसे पुण्यात परवडणाऱ्या भाड्याच्या घरांचा शोध घेत आहेत, तशी त्या प्रकारच्या स्थळांची संख्याही वाढत आहे. शक्यतो परवडणारे घर हवे, त्या घरांत पुरेशा सोयी हव्यात यावर लोकांचा भर असतो. त्या दृष्टीने पुण्यात व पुण्यालगत स्वस्त, योग्य किंमतीत मिळणारी भाड्याची घरे कुठे मिळू शकतात, याची घेतलेली माहिती आपण जाणून घेणार आहोत.

1) धनकवडी –

धनकवडी हे ठिकाण पुणे स्टेशनपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याजवळ असल्यामुळे अनेकजण धनकवडीतील परवडणाऱ्या भाड्याच्या घरांचा शोध घेतात. या परिसरात कात्रज लेक आणि स्नेक पार्क अशी निसर्गरम्य स्थळे आहेत. या परिसरात विद्यार्थी जास्त प्रमाणात असतात. विद्यार्थ्यांची पसंती या ठिकाणी आहे. शिक्षणाच्या दृष्टीने धनकवडी परिसरात भारती विद्यापीठ, सुदर्शन कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च शैक्षणिक संस्था, मेडिकल कॉलेज आहेत. तसेच आरोग्य सुविधेच्या दृष्टीने पवार हॉस्पिटल, सुयोग हॉस्पिटल ही महत्वाची सुविधा आहे.

धनकवडी जवळ प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल तसेच भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम हायस्कूल, सुदर्शन कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च शैक्षणिक संस्था आहेत. वैद्यकीय सुविधांच्या दृष्टिकोनातून भारती हॉस्पिटल, सुयोग हॉस्पिटल असी आरोग्य सुविधा आहे. धनकवडी येथे अनेक कंपन्या व कारखाने असून तिथे बहुतांश सर्वसामान्य कामगार राहतात. त्यामुळे या परिसरात भाड्याने घर घ्यायचे (Rental House At Pune)  तर वन बीएचके फ्लॅटचे भाडे 5 हजार 800 ते 15 हजार रुपये प्रति महिना आहे. तसेच 2 बीएचके फ्लॅटचे घरभाडे 15 हजार ते 20 हजार रुपये प्रति महिना असे आहे.

2) वारजे– Rental House At Pune

वारजे हे शहर पुण्यालगत असून पुण्यापासून ते अवघे 12 किलोमीटरवर आहे. वारजे शहर हे साधे खेडे होते. जंगलाने व्यापलेला भाग होता. परंतु 1970 साली वारजे परिसरात गृह निर्माण संकुले उभी राहिली. मुठा नदीच्या काठी वसलेल्या वारजेत बांधकाम व्यवसाय वाढला. त्यामुळे कंत्राटी कामगारांचा ओघ या परिसरात कामानिमित्त राहण्यासाठी आला. सद्यस्थितीत वारजे उपनगरात विकास होत आहे. विशेष म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने अनेक महाविद्यालये येथे झाली आहेत. वारजे येथे झोपडपट्टी असली तरी या ठिकाणी मध्यम वर्गही स्थायिक होऊ लागल्यामुळे येथे घरांना महत्व आले आहे. या परिसरात वन बीएचके फ्लॅटचे भाडे प्रत्येक महिन्याला 11 हजारापासून 16 हजार रुपयांपर्यंत आहे. तसेच टू बीएचकेचे भाडे महिन्याला 15 – 20 हजार रुपये असे आकारले जात आहे.

3) भोसरी–

भोसरी हे पुण्यापासून जवळपास 16 – 18 किलोमीटर आहे. तुम्हाला राहण्यासाठी निवांत, शांत ठिकाण हवे (Rental House At Pune) असेल तर भोसरी शहराला पसंती द्या. भोसरी शहरात छोटे मोठे उद्योगधंदे असून ते औद्योगिक शहर आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. सुप्रसिद्ध कंपन्या थरमॅक्स, टाटा मोटर्सचे उद्योग या परिसरात आहेत. या परिसरात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सोय असलेली नामांकित स्कूल्स व कॉलेजेस आहेत. तसेच आनंद मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व इतर हॉस्पिटल्सही आहेत. येथे 1 बीएचके फ्लॅटचे प्रतिमहा भाडे 9 हजार रुपयांपासून ते 17 हजार रुपयांपर्यंत परवडणारे आहे. तर 2 बीएचके फ्लॅटला प्रति महिना 17 ते 25 हजार भाडे आकारले जाते.

4) वाघोली–

वाघोली हे शहर पुणे स्टेशनपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. वाघोली हे पुणे शहराच्या पूर्वकडील भागात असून या परिसराचा पुण्याच्या उपनगरात समावेश होतो. वाघोली हे वेगाने वाढणारे पुण्याचे उपनगर असून ते पुणे-अहमदनगर रस्त्यावर आहे. या परिसरात 2015 नंतर निवासी गृहसंकुले बांधण्यास सुरुवात झाली. या परिसरात स्विमिंग पूल आणि लँडस्केप गार्डनसह अनेक सोयीयुक्त आलिशान फ्लॅट आहेत. तसेच परवडणाऱ्या किंमतीतही घरे मिळतात. म्हणजे सर्वसामान्य व श्रीमंतांसाठी राहण्याची सोय उपलब्ध आहे.

वाघोली परिसरात अनेक उद्योगधंद्यांचा विस्तार झाला असून लोकांची गर्दी या परिसरात आहे. तसेच शिक्षण, आरोग्याची सोयही उपलब्ध आहे. वाघोली परिसरात अपार्टमेंट्सची सोय आहे. तेथील भाडे दरमहा 10 ते 15 हजारापर्यंत आहे. तर राहण्यासाठी स्वतंत्र घरांचे भाडे दरमहा 15- 20 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. रहिवाश्यांच्या अधिक पसंतीमुळे या परिसराला सर्व थरातील लोक जास्त पसंरी देतात, असे दिसून आले आहे.

5)- कात्रज

कात्रज हा परिसर पुणे स्टेशनपासून 10 ते 11 किलोमीटरवर आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग नं. 4 लगत कात्रज परिसर आहे. कंपनीमध्ये काम करणारे नोकरदार व विद्यार्थ्यांना राहण्याचा एक चांगला पर्याय म्हणून कात्रजला अनेकजणांची पसंती आहे. कात्रजमध्ये स्वस्त, परवडणारी घरे मिळतात. तसेच राहण्यासाठी हाय सुविधाही मिळते. तुम्ही कोणता पर्याय निवडणार यावर ते अवलंबून आहे. कात्रज परिसरात चांगल्या शैक्षणिक सुविधा व हॉस्पीटल्सही आहेत. या ठिकाणी कदम प्लाझा मॉल्स उत्तम अशा शैक्षणिक संस्था व रुग्णालय तसेच वस्तूंची खरेदी करण्यासाठी कदम प्लाझासारख्या सुविधा आहेत. कात्रज परिसरात सर्वसामान्य माणसाला परडणारे भाडे (Rental House At Pune) असून 1 बीएचके फ्लॅटचे प्रतिमहा भाडे 7000 रुपये ते 8400 रुपयांपर्यंत आहे. येथे टू बीएचके फ्लॅटचे भाडे 8 हजार ते 15 हजारपर्यंत प्रत्येक महिन्याला आकारले जाते.

6) हिंजवडी–

हिंजवडी हे पुणे स्टेशनपासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. येथे आयटी हब आहे. त्यामुळे उचभ्रू व व्यावसायिक हिंजवडीत राहण्यास प्राधान्य देतात. या परिसरात आयटी आधारित व्यवसाय करणारे युवक जास्त प्रमाणात असून हे युवक एकत्र येत भागीदारी तत्वावर फ्लॅटमध्ये राहतात. विद्यार्थ्यांना येथे परवडणाऱ्या दरात शेअर तत्वावर राहता येते. हिंजवडी परिसरात मोठ्या शिक्षण संस्था व रुग्णालयांची सोयही रहिवाश्यांसाठी उपलब्ध आहे. उच्चभ्रू कस्टमर्ससाठी ग्रँड हायस्ट्रिट मॉल आणि फाउंटन मार्केटची उपलब्धी येथे आहे. हिंजवडीत 1 बीएचकेचा फ्लॅट भाड्याने घ्यायचा असेल तर त्याचे दर महिन्याला भाडे किमान 8 हजार ते कमाल भाडे 14 हजार आहे. तर 2 बीएचके चे भाडे 15 हजार ते 22 हजार रुपये प्रत्येक महिन्याला द्यावे लागते.