महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. राज्यात आचारसंहिता सुद्धा लागू करण्यात आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राज्यात राजकीय घडमोडींना प्रचंड वेग आला आहे. अशातच महाराष्ट्रात महायुती आणि महविकास आघाडीत मुख्य लढत होत आहे. आज महायुती सरकार कडून महत्वाची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
या पत्रकार परिषदेत महायुती सरकार कडून महायुती सरकारचे रिपोर्टकार्ड प्रकाशित करण्यात आले. २०२२ ते २०२४ या दोन वर्षात महायुती सरकारने केलेल्या कामांचा आढावा या रोपोर्टकार्डमध्ये देण्यात आला आहे. यावेळी माहिती देताना दोन वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी , महिला , युवक ,वृद्ध अशा सर्व घटकांसाठी महायुतीने काम केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देण्यात आली.
२ लाख बहिणींना मानधन
पत्रकार परिषदेत माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, विरोधकांकडून निवडणूक जाहीर होण्यापुर्वी मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात येतात अशी टीका झाली. मात्र अजित पवारानी या टीकेला उत्तर दिले. नेहमीच निवडणूक जाहीर होण्यापूर्वी कॅबिनेट मध्ये मोठे निर्णय घेतले जातात. असे अजित पवारानी सांगितले. शिवाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरूनही अनेकांनी टीका केली , ही योजना सुरु होणारच नाही, पैसे मिळणारच नाहीत अशी टीका होत होती. मात्र राज्यातील जवळपास २ लाख भगिनींना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळले अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.