Republic Day 2024 : कर्तव्यपथावरील संचलन सोहळ्यात ‘या’ राज्यांची झलक दिसणार; महाराष्ट्राच्या चित्ररथात काय असणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Republic Day 2024 : उद्या म्हणजेच २६ जानेवारीला भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे देशात एक नवा उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे कर्तव्य पथावर संचलन पाहायला मिळत. यंदाही पार बदलणाऱ्या झलकांविषयी माहिती समोर आली आहे, त्यानुसार एकूण ३० झलक कर्तव्य पथावर पाहायला मिळतील. यामध्ये २६ राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश आणि बाकीच्या सेवा क्षेत्राशी संबंधित असतील.

कोणकोणत्या राज्यांचा समावेश –

यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2024) कर्तव्य पथावर 90 मिनिटांचा परेड कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यावेळी कर्तव्य पथावर अरुणाचल प्रदेश, लडाख, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र, हरियाणा, ओडिशा, मणिपूर, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश,आंध्र प्रदेश, मेघालय, झारखंड, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यासह इस्रो, वैज्ञानिक परिषद, बंदरे, शिपिंग आणि जल, औद्योगिक संशोधन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, ITBP, गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाची झलक देशवासियांना पाहायला मिळेल.

महाराष्ट्राच्या चित्ररथात काय असणार? Republic Day 2024

दरवर्षीप्रमाणे यंदाही (Republic Day 2024) महाराष्ट्राच्या चित्ररथात काय असणार? असा प्रश्न मराठी माणसाला पडला आहे. तर भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ चित्ररथ दिसणार आपल्याला कर्तव्यपथावर पाहायला मिळणार आहे. या चित्ररथात शिवरायांचा बालपणीची प्रतिकृती आणि जिजाऊ माता दिसतील. यासोबतच शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ, संभाजी महाराज, न्यायाचा तराजू, गाऱ्हाणे मांडणाऱ्या महिलांची दखल घेणारे महाराज अशी दृशे दिसतील. महाराष्ट्राच्या या चित्ररथाची सर्व शिल्पे यवतमाळ जिल्ह्यात तयार करण्यात आली आहे.