संविधान प्रत जाळणार्यांवर कडक कारवाई करा, रिब्लिकन मजदूर संघाची मागणी

Constitution burnt in delhi
Constitution burnt in delhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | दिनांक ८ आॅगस्ट रोजी दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर संविधानाची प्रत जाळण्याचा प्रकार घडला होता. सदर घटना प्रसारमाध्यमांनी समोर आणताच सोशल मिडीयावर त्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. संविधानाची प्रत जाळतानाची छायाचित्रे, व्हिडीओ सोशल मिडियावर वायरल होत असून त्याविरोधात निषेध नोंदवला जात आहे. दिल्लीत घडलेल्या या घटनेचे पुण्यातही प्रतिसाद उमटत असून रिपब्लिकन मजदूर संघ ने मार्केटयार्ड पोलीस स्टेशन ला संबंधितांवर कारवाइची मागणी करणारे निवेदन देऊन निषेध नोंदवला आहे.

संविधानाची प्रत जाळणाऱ्या संघटनेचं नाव अजुन कळू शकलेल नसून, काही व्यक्तिंची नावे समोर आली आहेत. संजय शर्मा, अनूप दुबे, कृष्णमोहन रॉय, रोहित गुप्ता, आशुतोष झा, संतोष झा, संतोष शुक्ल, परवेश साहनी, कामिनी झा, श्रीनिवास पांडे अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन मजदूर संघाचे अध्यक्ष सुहास बनसोडे, शतायु भगळे , रिजवान शेख, सूर्यकांत जाधव यांनी केली आहे.