रिपब्लिकन ऐक्य ही काळाची गरज !!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विचारविश्व | रविंद्र बनसोडे

धर्माप्रमाणे राजकारणात निष्ठा बाणली नाही, तर तो लंफग्याचा बाजार बनेल
डॉ बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सांस्कृतिक राष्ट्रवादी संघटनेने नरेंद्र मोदींच्या माध्यमातून दिलेल्या :सबका साथ सबका विकास’ या भुलथापाच्या गाजराला भुलून आंबेडकरी समुह रिपब्लिकन गटाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या जाळ्यात फसला आहे या फसल्या गेलेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज विचार करण्याची वेळ आली आहे असे वाटते
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या २६ नोव्हेबर १९४९ रोजी समारोपाच्या भाषणामध्ये इशारा दिला होता. आज आपण विसंगतपुर्ण सामाजिक जीवनात प्रवेश करीत आहोत आज आपण भारतीय समाजाला एक माणुस, एक मत, एक मुल्य,या माध्यमातून मताचा अधिकार देऊन राजकीय समता तर देत आहोत पण या देशातील सामाजिक आर्थिक विषमता नष्ट करून स्वभावतःच या देशातील राष्ट्रविरोधी असणारा हिंदु धर्मातील जातीभेदाचा उच्छाद आटोक्यात आणण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ साली २२ प्रतिज्ञानी धम्मदिक्षा देऊन समाजाची धारणा करून दुसऱ्या बाजूने खुल्या पत्रावर आधारीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली. आज आपण त्या खुल्या पत्रावर आधारीत पक्ष चालवत आहोत की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीनिर्मुलनाच्या ध्येयाच्या विरोधी प्रस्थापित पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे सेल असल्यासारखे वावरत आहोत, याचा विचार करण्याची वेळ आज डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि रिपब्लिकन पक्षाचे नांव घेऊन राजकारण करणाऱ्या अनुयायांवर आली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आर्थिक विषमता व राष्ट्रविरोधी असणाऱ्या हिंदू धर्म, संस्कृती व त्यांच्या राजकीय पक्षाना आटोक्यात आणण्यासाठी नवयान बौध्द समाज निर्मितीतुन खुल्या पत्रावर आधारीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आहे परंतु रिपब्लिकन नेतृत्वाने आजपर्यंत नवयान बौध्द समाज निर्मिती व त्या समाजाचे आर्थिक सामाजिक प्रश्नांचे गांभीर्य समजुन घेतले नसल्यामुळे रिपब्लिकन नेतृत्वाने आजपर्यंत नवयान बौध्द समाजाची आर्थिक शैक्षणिक प्रश्नांच्या अजेंड्याची चर्चा न करता भावनिक प्रश्नांची चर्चा करून निवडणुकीच्या काळात सर्व जागावर कार्यकर्त्यांना निवडणूका लढवुन त्या माध्यमातून स्थानिक गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेतृत्व निर्माण करून स्वतःच्या पक्षाला निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असताना अशा प्रकारे कोणतीही निवडणूक सर्व जागावर न लढविता आंबेडकरी ध्येय उद्देशाच्या विरोधी असणाऱ्या पक्षाबरोबर युती आघाड्याच्या नावाखाली चार पाच जागा मिळवुन आंबेडकरी ध्येय उद्देशाच्या विरोधी असलेल्या
कमळ,धनुष्यबाण, पंजा, घड्याळ या चिन्हावर निवडणुका लढविल्या. यांची चर्चा घडवून आंबेडकरी ध्येयापेक्षा साधनाला महत्त्व देऊन आंबेडकरी समुहामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण केली. आजपर्यंत या गोंधळाचा फायदा प्रस्थापित पक्षांना झाला आहे. या गोंधळाच्या परिस्थितीतुन आंबेडकरी समाजाला बाहेर पडायचे असेल तर आजच्या काळाच्या संदर्भात भावनिक प्रश्नांच्या पुढे जाऊन सामाजिक आर्थिक शैक्षणिक परिस्थिती समजुन घ्यावी लागेल,
ज्या हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेने येथील अस्पृश्य ओबीसी बौध्द या समुहाचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक विषमता निर्माण करून शोषण पिळवणुक वर्षानुवर्षे केली गेली त्या पिळवणुकीचे मुळ शोधण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी भारतातील जातीची उत्पती व विकास यांचा अभ्यास करून भारतातील सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेचे वाटप हे जातीनुसार केले असल्याने सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठेचे समान वाटप जातीनिर्मुलनाशिवाय होणार नाही या निष्कर्षावर ते येऊन ज्या हिंदू धर्माने जातीच्या उतरंडीची समाजमानसिकतेची धारणा केली त्या हिंदु धर्मातील जातीच्या उतरंडीच्या समाजाची चिकित्सा करून डॉ बाबासाहेब आंबेडकर थांबले नाहीत तर विषमता असलेल्या हिंदु धर्माचा त्याग करून समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायावर आधारित २२ प्रतिज्ञांची दिक्षा देऊन नवायान बौध्द धम्म समाजाची धारणा करण्यासाठी दरेकाने दरेकाला दिक्षा देण्याचा अधिकार देऊन दुसऱ्या बाजूला सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी राज्यघटनेच्या माध्यमातून संसदीय मार्गाचा अवलंब करून संसदेमध्ये जाऊन बौध्द ओबीसी अस्पृश्याची सामाजिक आर्थिक शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी खुल्या पत्रावर आधारीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडुन साधने निर्माण केली. रिपब्लिकन नेतृत्वाने आजपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांना खुल्या पत्रावर आधारीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना समजावून सांगितले की नाही? हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे (बी सी कांबळे) वगळता डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी खुल्या पत्रावर आधारीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना कार्यकर्त्यांना समजावुन न सांगितल्यामुळे आज रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता रिपब्लिकन पक्षाचे नांव घेऊन ज्या हिंदू धर्म संस्कृतीने येथील भारतीय समाजाला सामाजिक आर्थिक गुलाम बनविले. हिंदु नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि हेडगेवारांचे होर्डिंग्ज लावुन दिवस साजरा करून ज्या हिंदू धर्म संस्कृतीचे संरक्षण करणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या राजकीय चिन्ह असणाऱ्या कमळ धनुष्यबाण यावर निवडणूक लढवुन स्वतःची व आंबेडकरी समाजाची फसवणुक करीत आहोत हे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भुमिका लक्षात घेतली पाहिजे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात (धर्माप्रमाणे राजकारणात निष्ठा बाणली नाही तर तो लंफग्याचा बाजार बनेल) या लफंग्याच्या बाजारातुन मुक्तता हवी असेल आणि हिंदुत्वाच्या व नरेंद्र मोदींच्या विकासाच्या भुलथाप्यातुन आंबेडकरी समाजाला बाहेर काढायचे असेल तर डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी १९४६ साली दिलेला इशारा लक्षात घेतला पाहिजे (थॉटस आॅन पाकिस्तान) या ग्रंथात भारतीय समाजाला इशारा देताना म्हणाले की हिंदू राज्य सत्यात उतरले तर देशावर सर्वाधिक भीषण संकट ओढवेल यात शंका नाही हिंदु काहिहि म्हणोत हिंदुत्व हे समता स्वातंत्र्य बंधुत्वाच्या विरोधात असल्यामुळे लोकशाहीला घातक आहे म्हणून काहीही करून हिंदुराज येण्यापासून रोखावे लागेल या परिस्थितीत धर्माध हिंदुत्वाचा व ब्राम्हणी भांडवलशाहीचा धोका वाढला असताना त्याला रोखण्याचे सामर्थ्य फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या नवयान बौध्द समाज निर्मितीतुन होऊ शकतो डॉ बाबासाहेब नवायान बौध्द समाजाबद्दल बोलताना म्हणतात आम्हाला राजकीय हक्क प्राप्त व्हावेत कायदेमंडळात जागा मिळाव्यात आणि समाजाने समतेने वागवावे म्हणून भारतात आम्ही एक प्रदीर्घ राजकीय युध्द खेळीत आहोत तथापि आम्ही अध्याप यशस्वी झालो नाही या गोष्टीचा अर्थ असा की राजकीय संग्रामातुन आम्हास मुक्ती मिळालेली नाही गेली ३५ वर्ष मी राजकीय लढाई चालविली आहे या लढाईत मोठ मोठ्या उच्च हिंदुच्या तलवारी बरोबर तलवार मला भीडवावी लागली याच काळात जगातील सर्व धर्मांचा मी अभ्यासही केला आणि आता शेवटी एका अपरिहार्य निणर्यास मी येऊन पोहचलो आहे तो निर्णय हाच की बौध्द धर्माशिवाय अस्पृश्याना दुसरा कोणताही मुक्तीचा मार्ग नाही फक्त बौध्द धर्मातच अस्पृश्यतेचा निवारणाचा चिरकालिन उपाय आहे जर तुम्हास समतेचे तत्व हवे असेल आणि अर्थिक दास्यातुन मुक्तता करावयाची असेल तर बौध्दवादाशिवाय कोठेच दुसरा आश्रय नाही.

(लेखक बौध्द युवा संघर्ष समिती महाराष्ट्र चे राज्य संघटक आहेत )

Leave a Comment