राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे; रुग्णांना मोठा दिलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । गेल्या 2 दिवसांपासून सुरु असलेला राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप (Mard Doctors strike in Maharashtra)अखेर आज मागे घेण्यात आला आहे. आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासोबत संपकरी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळावा आहे.

निवासी डॉक्टरांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. वसतिगृहासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमची आज डॉक्टरांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांनी आता संप मागे घेतला आहे अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सीनियर रेसिडेंट्सचा 1432 पदांचा प्रश्न सुद्धा सुटेल. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये ही सगळी पदे भरली जातील अशी ग्वाही महाजन यांनी दिली तसेच वसतिगृहासाठी केंद्र सरकारकडून 500 कोटींच्या निधी मागितला आहे. त्याशिवाय, सीएसआर अंतर्गत निधीची मागणी कॉर्पोरेट क्षेत्राकडे करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांचे इतर प्रश्न देखील सोडवले जातील असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले.