औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन आयटक संघटनेच्या वतीने तहसीलदार डॉ. शितल राजपूत यांना अंगणवाडी पोषण ट्रॅकर अँप हे इंग्रजी भाषेत असून ते मराठी भाषेत करावे यासह विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा आयटक संघटनेकडून देण्यात आला आहे.
निवेदनत म्हटले आहे की,दर महिन्याला पोषण ट्रॅकर अँपमध्ये अंगणवाडी सेविकांना माहिती भरावी लागते. मात्र सदरील अँपमध्ये इंग्रजी असल्याने असंख्य अडचणीसह अंगणवाडी सेविकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे सदरील अँपमध्ये मराठी भाषेचा पर्याय देण्यात यावा. सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचार्याचे एकरकमी लाभ हा सेवानिवृत्त होताना अदा करावेत. थकीत प्रवास भत्ता देयक त्वरित अदा करावीत, मोबाईल वर काम करण्यासाठी इंटरेरनेटचे रिचार्ज पैसे नियमितपणे मिळावेत, सेविका व मदतनिसंचा रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात, अतिरिक्त कामाचा अंगणवाडी सेविका व मदतनिसंना वेगळा मोबदला देण्यात यावा, पोषण ट्रॅक्टर अँपचे मराठी काम होत नाही तोपर्यंत एक जुलैनंतर राजव्यापी आंदोलन सुरु करू असा इशारा देण्यात आला आहे.
याप्रकारणी फुलंब्रीच्या तहसीलदार डॉ. शीतल राजपूत व बालविकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र काकडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात अंगणवाडी सेविकांच्या प्रमुख मागण्याचा विचार करून तातडीने शासनाकडे पाठवावे आणि अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्याच्या या मागण्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियमच्या तालुकाध्यक्ष सुनीता शेजवळ, बेबी डिडोरे, नूरजहा पठाण, सुनीता छत्रे, अरुणा सोनुने, सुनिता मगर शोभा डिडोरे आदींची उपस्थिती होती.