शिंदे गटातील आमदारांच्यात अस्वस्थता : आ. बाळासाहेब पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
भारत गोगावले, संजय शिरसाठ हे शिंदे गटातील आमदार आपण मंत्री होणार असल्याचे सांगत आहेत. खरंतर हा अधिकार सर्व मुख्यमंत्र्यांचा असतो. भाजप बाहेरून पाठिंबा देईल असे वाटत होते. शिवसेनेतून फुटून गेलेल्या 50 आमदारांना मंत्रिपद मिळणार असे सांगितले होते. परंतु, तसे काय होत नसल्याने आता या आमदारांच्या अस्वस्थता असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार व माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले.

काही लोकांच्या सांगण्यावरून केंद्रातील व राज्यातील यंत्रणा काम करतात ः- राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ऑफिसवर ईडीने छापा टाकला आहे. परंतु गेल्या काही दिवसापूर्वी इन्कम टॅक्सने अशा पद्धतीने छापा टाकला होता. दिलीप वळसे -पाटील, संजय राऊत यांच्यावरही कारवाई करण्यात आली मात्र ते बाहेर आले. एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचे आणि त्याला समाजातून उठवायचं अशा पद्धतीचे राजकारण सध्या सुरू आहे. देशात काही लोकांच्या सांगण्यावरून केंद्रातील व राज्यातील यंत्रणा काम करत आहेत. हे लोकशाहीच्या दृष्टीने मारक असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/474480658170769

सरकारची भूमिका निवडणुका न घेण्याचे ः- शिंदे- फडणवीस सरकार हे घटनाबाह्य आहे. कोर्टात या सरकारवर टांगती तलवार आहे. तसेच जनतेकडून आपल्याला पाठिंबा मिळणार नाही, असे सरकारला वाटते. त्यामुळे निवडणुका घेण्याचे धोरण घेण्याऐवजी, सरकार कोर्टाकडे वेळ मागत आहे. तसेच स्वीकृत नगरसेवक किती घ्यावेत, याची एक मर्यादा असते. मात्र, लोकांना प्रलोभने दाखवण्यासाठी स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढवली असल्याचा आरोप आमदार बाळासाहेब पाटील यांनी केला आहे.