Satara News : रेठऱ्याचा पूल ‘मे’ महिन्यात वाहतूकीस खुला होणार : पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
पावसाळ्यात पूरस्थितीमुळे मोठ्या वाहतूकीस बंद असलेला रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा नदीवरील पूलाच्या दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पूलाचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण होणार असून मे महिन्यात वाहतूकीसाठी खुला होणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण दिली.

रेठरे येथील जुन्या पुलाच्या दुरूस्ती कामासाठी 6 कोटी रुपये मंजूर झाले होते त्याची पाहणी केली. तसेच रहिमतबुवा पीर देवस्थान व मुस्लिम समाजाच्या शाही कब्रस्तान कडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या ओढ्यावर 25 लाख रुपये खर्चाच्या साकव पुलाचे भुमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी रेठरे बुद्रुकच्या विविध विकास कामांच्यासह व कृष्णानदी कडेला पुलाच्या व महादेव मंदिरा शेजारी असणाऱ्या ग्राउंड कडेला नदी कडेच्या बाजूला घाट वजा भिंत बांधून ग्राऊंडची लांबी वाढविण्या संदर्भात काय करता येईल, यावर संबधित अधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली.

यावेळी य. मो. कृष्णा सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते, शिवराज मोरे, इंद्रजित चव्हाण, गजानन आवळकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिग्विजय पाटील, युवक काँग्रेसचे प्रवक्ते दिग्विजय सूर्यवंशी, पं. स. माजी सभापती सौ. शोभाताई सुतार, कृष्णत चव्हाण, रियाज आंबेकरी, मुनिर मुजावर, आरिफ मुजावर, सनी मोहिते, रणजित पवार, शिवसेना ठाकरे गटाचे ऋषीकेश महाडिक, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ओंकार मोहिते, प्रशांत लोखंडे, देवदास माने, बापू साळुंखे, राम मोहिते, महेश कणसे, शरद पाटील, बबन सुतार, डॉ. प्रल्हाद मदने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.