बेलवडे येथे सेवानिवृत्त पोलिस तुकाराम कुंभार यांचा सत्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड : स्व. सौ मंदाकिनी व्यंकटराव देशमुख यांच्या स्मरणार्थ बेलवडे हवेली गावात डिजिटल क्लासरूम लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावाच्या वतीने गावातील सर्वात जेष्ठ व्यक्ती म्हणून तसेच पोलीस दलात सेवा बजावल्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने तुकाराम राऊ कुंभार (वय-95) यांचा कराडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. रणजीत पाटील व प्रांतधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, दिलीप कुंभार, महेश कुंभार, प्रताप पवार, सरपंच श्रीकांत पवार, व्यंकटराव देशमुख, तळबीड पोलीस स्टेशनच्या जयश्री पाटील, बजरंग पवार आदी यावेळी उपस्थित होते.

डाॅ. रणजीत पाटील म्हणाले, तुकाराम कुंभार यांनी वयाची 95 वर्षे पूर्ण करत असताना त्यांच्या कार्याबद्दल व जेष्ठते बद्दल बेलवडे ग्रामस्थांना कायमच आदर वाटतं आला आहे. अशीच लोकांच्या बाबत जिव्हाळा व पोलीस दलाबाबत आदर बाळगणाऱ्या बेलवडे गावचा आदर्श सर्वांनी घ्यावा, अशी ही घटना आहे. तसेच व्यंकटराव देशमुख यांनी स्व. सौ. मंदाकिनी व्यंकटराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्यंकटराव देशमुख यांनी गावातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी. या उद्देशाने डिजिटल क्लासरूमची उभारणी नक्कीच येथील मुलांना एक प्रेरणा देईल.