दिवाळीला वापरलेल्या मातीच्या पणत्यांचा करा पुनर्वापर ; वापरा ‘ही’ भन्नाट ट्रिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिवाळीचा सण हा पणत्यांशिवाय अपूर्ण आहे. मातीची पणती असेल तेव्हाच दिवाळी साजरी करण्याची मजा येते. तुम्ही देखील यंदाच्या दिवाळीला मातीच्या पडत्या तुमच्या अंगणामध्ये लावल्या असतील. आता दिवाळी संपून गेले त्यामुळे आपण त्या पणत्यांचे करायचं काय ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तुम्ही या पणत्या पुढच्या वर्षीसाठी दिवाळीला ठेवत असाल सुद्धा… पण आजच्या लेखांमध्ये या पणत्या वापरण्याची एक भन्नाट ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

तांबा -पितळेची चमक वाढवा

मातीच्या पणत्यांचा वापर करून घरातली रोजची भांडी तुम्ही स्वच्छ करू शकता. त्यातही लोखंडाची कढई, तवा वापरून वापरून खराब झालेली भांडी यासोबतच घरातील पूजेची किंवा तांब्या पितळेची भांडी ही लवकर काळी पडतात. तांबा पितळेची भांडी चमकवण्यासाठी आपण दिवाळीच्या पण त्यांचा वापर करू शकतो आता ह्या पडता नेमक्या कशा वापरायच्या चला जाणून घेऊया

सगळ्यात आधी चार ते पाच साध्या मातीच्या पडत्या घ्या किसणीने त्यावर घासून त्याची पावडर तयार करा ही माती एका वाटीत काढून घ्या. त्यात एक चमचा मीठ, लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा ही तयार पेस्ट स्पंज किंवा हातांच्या मदतीने भांड्यावर लावून तांब्या पितळेची भांडी हलक्या हाताने घासून घ्या. आपल्याला अधिक कष्ट घेऊन घासण्याची गरज नाही. या पेस्टमुळे भांड्यावरील काळपटपणा लगेच निघून जातो. तयार पेस्टच्या मदतीने भांडी घासल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. या पेस्टमुळे भांड्यावरील काळपट डाग निघून जाईल आणि भांडी नव्या सारखेच चमकतील.

दररोजच्या भांड्यांसाठी

तर दररोजच्या स्वयंपाकाच्या भांड्यांबद्दल सांगायचं झाल्यास कढई, तवा दररोज वापरून रापुन जातात. तेलामुळे तेलकट आणि चिकट होतात अशी भांडी स्वच्छ करण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. अशावेळी आपण दिवाळीतील वापरलेल्या पणत्यांचा वापर करू शकतो. यासाठी सर्वात आधी वापरलेल्या पणत्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्याव्यात त्यानंतर एका डिशमध्ये भांड्यासाठी जो साबण वापरतो तो साबण किसणीवर बारीक किसून घ्यावा. या साबणाच्या चुऱ्यात किंचित चमचाभर पाणी घालून त्याचा गोळा तयार करून घ्यावा. हा गोळा मातीच्या पणत्यांमध्ये भरून घ्यावा अशाप्रकारे आपण थोडेसे डिटर्जंट घेऊन देखील किंचित पाण्यात भिजवून आपण त्यामध्ये भरून ठेवू शकता रोजची कढई तवा घासताना या पणत्यांमध्ये ज्या भागात साबण डिटर्जंट भरला आहे तो भाग भांड्याच्या पृष्ठभागावर घासून घ्यावा अशाप्रकारे या पणत्यांचा वापर करून घरातील रोजच्या स्वयंपाकाचे भांडे देखील आपण स्वच्छ करू शकतो.

वरील माहिती एका इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आली आहे