Rice Rate | देशातील सर्वसामान्य लोकांसाठी सरकारकडून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ते म्हणजे आता नागरिकांना स्वस्त दरामध्ये तांदूळ मिळणार आहे. सरकारने एक नवीन आराखडा तयार केला आहे. त्यामुळे आता लोकांना स्वस्त दरात तांदूळ मिळतील असे देखील बोलले जात आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार हा तांदूळ आता लोकांना सरकार पुरवणार आहे. तांदळावरील बंदी हटवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. यासोबतच तांदूळ देखील बाजारात आणणार आहे.
सरकार विकणार स्वस्त दरात तांदूळ | Rice Rate
आता महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे केंद्र सरकार लोकांना हे स्वस्त दरात तांदूळ उपलब्ध करून देऊन त्यांना एक दिलासा देणार आहे. सरकारचा हा तांदूळ आता जनतेला राईस फ्रेंड या नावाने मिळणार आहे. या तांदळाची किंमत केवळ 29 रुपये प्रति किलो असल्याचे देखील बोलले जात आहे. त्याचप्रमाणे सगळ्या तांदूळ व्यापाऱ्यांना त्यांचा साठा स्पष्ट करण्यात देखील सांगितले आहे. याबाबत केंद्रीय अन्नसचिव संजीव चोप्रा यांनी सांगितले की गेल्या एका वर्षात किरकोळ आणि खाऊ बाजारात तांदळाच्या किमती सुमारे पंधरा टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे आता सरकार जनतेला स्वस्त दरात तांदूळ देण्याचा निर्णय घेणार आहे.
हेही वाचा – NDA Group C Vacancy 2024 | नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये तब्बल 198 पदांची भरती, आताच करा अर्ज
सरकारच्या या नवीन निर्णयामुळे तांदूळ विक्रीची जबाबदारी ही दोन सहकारी संस्थांवर देण्यात येणार आहे. यामध्ये नॅशनल अग्रिकल्चर को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांना देणार आहे. हे तांदूळ ई-कॉमर्सच्या माध्यमातून खरेदी करता येईल सरकार हे केवळ पाच किलो आणि दहा किलो पोत्यातून हे तांदूळ विकणार आहे.
सरकार 5 लाख टन तांदूळ देणार
याबाबत अन्नसचिव संजीव चोप्रा म्हणाले की, “लोकांच्या सोयीसाठी सरकार पाच लाख टन तांदूळ बाजारात आणणार आहे. यासोबत तांदूळ साठवणुकीवर मर्यादा घालण्याचा ही सरकार विचार करत आहे तांदळाच्या निर्यातीवरील बंदी तुर्तास कायम राहणार असून तांदळाच्या किमती स्थिर होईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे असे देखील सांगितले.”