Richest Man In Pune : राज्यात सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या शहरांच्या यादीत मुंबईनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. नोकरी, शिक्षण सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. मात्र पुणे त्याच्या श्रीमंतीसाठी सुद्धा ओळखले जाते. आता अशा या पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ? (Richest Man In Pune) याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या लेखात मिळणार आहे.
पुण्यातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव आहे. ‘सायरस पुनावाला’. काही दिवसांपूर्वी हुरून इंडिया कडून देशातील सर्वात श्रीमंत 10 व्यक्तींची नावे जाहीर करण्यात आली होती. यातही सायरस यांचे नाव 4 थ्या क्रमांकावर आहे. पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती देशातील सर्वांचे श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
कोरोना वरील लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे ते मालक आहेत. सायरस पूनावाला आणि कुटुंब 2.90 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह श्रीमंतांच्या (Richest Man In Pune) चौथ्या क्रमांकावर आहेत.
कोविड-19 वर लस (Richest Man In Pune)
सिरम इन्स्टिट्यूट कडून कोरोना विरोधात लस तयार केली गेली. याबद्दल सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले आहे. सिरम चे सीईओ आणि सायरस पूनावाला यांचा मुलगा आदर पुनावाला यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने कोविड-19 वर लस तयार केली. कोविशील्ड असे या लसीचं नाव होतं आणि भारतात ही लस सर्वाधिक प्रमाणात (Richest Man In Pune) वापरली गेली.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असा जर प्रश्न पडला असेल तर पोर्ट, एअरपोर्ट पासून सिमेंट, ग्रीन एनर्जी सेक्टर मध्ये काम करणारे उद्योगपती गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून अशी यातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्येही ह्यांचं नाव सर्वात पुढे आहे. त्यांची संपत्ती ही 10.14 लाख कोटी इतकी आहे तर एचसीएल टेक्नॉलॉजी चे फाउंडेशन 3.14 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सिरम इन्स्टिट्यूट चे मालक सायरस पूनावाला हे या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर (Richest Man In Pune) आहेत.