हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Richest Railway Stations In India- देशाला कोट्यवधींची कमाई मिळवून देणारी ही 4 रेल्वे स्थानके ठरली अव्वलदेशात दररोज दोन कोटींपेक्षा अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. देशभरात 7,308 हून अधिक रेल्वे स्थानक आहेत आणि ही स्थानके केवळ प्रवाशांसाठीच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात कमाईसाठीही महत्त्वाचे ठिकाण ठरली आहेत. तिकिटांची विक्री, स्टेशनवरील दुकानं, जाहिराती यांसारख्या माध्यमांतून भारतीय रेल्वे दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करते. तर चला देशातील जास्त कमाई करणाऱ्या रेल्वे स्थानकांची माहिती पाहुयात.
नवी दिल्ली रेल्वे स्टेशन –
अलीकडेच भारतीय रेल्वेच्या आर्थिक वर्षांमधील मधील कमाईचा अहवाल जाहीर झाला असून त्यात नवी दिल्ली रेल्वे स्टेशनने सर्वाधिक महसूल जमा केला आहे. या स्टेशनने एकूण 3337 कोटी रुपयांची कमाई (Richest Railway Stations In India) केली आहे. नवी दिल्ली हे देशातील सर्वाधिक वर्दळीचे आणि महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी हे महत्त्वाचे केंद्र आहे.
हावडा रेल्वे स्टेशन (Richest Railway Stations In India)-
कमाईच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर हावडा रेल्वे स्टेशन आहे. कोलकात्यातील हे स्टेशन पूर्व भारताचे प्रमुख रेल्वे केंद्र आहे. हावडाने 1692 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हावडा रेल्वे स्थानकावर दिवसाला लाखो प्रवासी ये-जा करतात.
चेन्नई सेंट्रल स्टेशन –
दक्षिण भारतातील चेन्नई सेंट्रल हे स्टेशन तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नई सेंट्रलने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 1299 कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. दक्षिण भारतातील प्रमुख शहरांशी जोडणारे हे स्टेशन रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचे ठरले आहे.
चेन्नई सेंट्रल हे स्टेशन –
चौथ्या क्रमांकावर तेलंगाणामधील सिकंदराबाद रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनने 1276 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दक्षिण-मध्य रेल्वे विभागासाठी सिकंदराबाद हे प्रमुख केंद्र मानले जाते आणि तेलंगाणाच्या राजधानीसाठी हे महत्त्वाचे स्थानक आहे. भारतीय रेल्वे स्थानकांच्या माध्यमातून कमाई वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जातात. स्टेशनवर जाहिराती, कमर्शियल स्पेस आणि इतर सेवा यांसारख्या विविध मार्गांनी रेल्वेचा महसूल वाढत आहे.