Right To Free Internet | इंटरनेटबाबत नागरिकांना मोठा दिलासा; लवकरच लागू होणार राईट टू फ्री इंटरनेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Right To Free Internet | 3 जुलैपासून देशातील अनेक खाजगी टेलीकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्लॅनमध्ये बदल केलेले आहेत. देशातील जीओ एअरटेल आणि व्हीआय या आघाडीच्या कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केलेली आहे. त्यांनी त्यांच्या प्लॅनमध्ये वाढ केल्याने ग्राहकांमध्ये देखील प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच आता ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी येत आहे. ती म्हणजे आता आपल्या देशात लवकरच राईट टू फ्री इंटरनेट (Right To Free Internet) सेवा लागू केली जाणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना मोफत इंटरनेटची सुविधा दिली जाणार आहे. कंपन्यांनी त्यांच्या टेरिफ प्लॅनमध्ये वाढ केल्यानंतर ग्राहकांसाठी हा एक मोठा दिलासा असणार आहे.

राईट टू फ्री इंटरनेट (Right To Free Internet) हे विधेयक मागच्या वर्षी संसदेत मांडण्यात आले होते. आणि आता यावर एक नवीन अपडेट समोर येत आहे. तो म्हणजे आता दूरसंचार मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यसभेच्या सरचिटणीस यांना कळविण्यात देखील आलेले आहे.आणि यावर विचार करण्याची शिफारस केलेली आहे. हे विधेयक मंजूर झाले, तर नागरिकांना फ्री इंटरनेटचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे आता सगळेजण खूप खुश आहेत. या विधेयकात देशातील गरीब घटकातील आणि मागास लोकांना मोफत इंटरनेटची सुविधा मांडण्यात आलेली आहे. देशातील गरीब लोक डिजिटल इंडियापासून लांब राहता कामा नये, यासाठी ही मागणी केलेली आहे.

आपल्या देशात अनेक अशे ठिकाण आहे. जिथे अजूनही इंटरनेटचा पुरेसा वापर केला जात नाही. त्यांना इंटरनेट सेवेचा लाभ मिळत नाही. हे सगळे लोक डिजिटल जगापासून खूपच लांब आहे. यामुळे खेड्यापाड्यातील दुर्गम भागातील लोकांना डिजिटल इंडियाची ओळख व्हावी. या उद्देशाने राईट टू फ्री इंटरनेट (Right To Free Internet) हे विधेयक मागील वर्षी संसदेत मांडण्यात आलेले होते.