Road Accident : दिलासादायक ! रस्ते अपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारची नवी योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Road Accident : देशामध्ये रस्ते अपघातांची संख्या मोठी आहे. त्यातही आपघातानंतर योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे केंद्र सरकार याबाबतीत मोठी पावले उचलण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने रस्ते अपघातातील जखमींना कॅशलेस उपचार देण्याची योजना आखली आहे. याबाबतची माहिती गुरुवारी संसदेत (Road Accident) देण्यात आली.

किती रुपये मिळणार ?

सध्या चंदीगड आणि आसाममध्ये प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. लोकसभेत एका लेखी उत्तरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती देताना म्हंटले की, योजनेंतर्गत पात्र पीडितांना आयुष्मान भारत प्रधान मंत्री-जनता अंतर्गत पॅनेलमधील रुग्णालयांमध्ये अपघाताच्या (Road Accident) तारखेपासून जास्तीत जास्त सात दिवसांसाठी 1.5 लाख रुपये दिले जातील. आरोग्य योजना (ABPM-JAY) ट्रॉमा आणि पॉलीट्रॉमा संबंधित आरोग्य लाभ पॅकेजेस देता येणार आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, त्यांच्या मंत्रालयाने (Road Accident) राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) च्या सहकार्याने कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर वाहनांमुळे होणाऱ्या अपघातग्रस्तांना कॅशलेस उपचार देण्यासाठी एक योजना तयार केली आहे. चंदीगड आणि आसाममध्ये प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, मंत्रालयाची ही योजना मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 164B अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या मोटार वाहन अपघात निधी अंतर्गत प्रशासित केली जात आहे. ते म्हणाले की, उत्पन्नाचा स्रोत आणि त्याचा वापर केंद्रीय मोटार वाहन (मोटर वाहन अपघात निधी) नियम, 2022 अंतर्गत प्रदान करण्यात आला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण (Road Accident) मंत्रालयाच्या अंतर्गत NHA स्थानिक पोलीस, पॅनेलमधील रुग्णालये, राज्य आरोग्य संस्था, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र आणि सामान्य विमा परिषद यांच्या समन्वयाने कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे.

गडकरींनी पुढे सांगितले , मोटार वाहन कायदा, 1988 मधील आदेश लक्षात घेऊन चंदीगड आणि आसाममध्ये वाहनांच्या अपघातात बळी पडलेल्यांवर कॅशलेस उपचारांसाठी सुरू करण्यात आलेला पायलट कार्यक्रम रस्ता अपघातांच्या (Road Accident) स्थानावर आधारित असेल.