हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Road Trip) पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सगळ्यांनाच आवडतो. कारण, पावसाळ्याच्या दिवसात निसर्गाचे सौंदर्य दहा पटीने वाढलेले असते. असा निसर्ग मनाला विशेष आनंद देतो आणि हा आनंद घ्यायचा असेल तर पावसाळ्यात एखादी रोड ट्रिप करावी. त्यात जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर आवर्जून मोठी सुट्टी काढून पावसाळ्यात रोड ट्रिप प्लॅन करा. आपल्या मित्र मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबियांसोबत केलेली ही ट्रिप तुम्हाला तणावमुक्त करेल. आता अशी ट्रिप करायची तर चांगली आणि परफेक्ट ठिकाणं माहित हवीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रोड ट्रीपसाठी बेस्ट ऑप्शन्स देणार आहोत. कमी अंतर, कमी वेळ आणि एक अनोखा आनंद देणाऱ्या या रोड ट्रिप तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवालं.
1. मुंबई ते गोवा (Road Trip)
मुंबई ते गोवा ही लॉन्ग ड्राइव्हसाठी एक बेस्ट रोड ट्रिप आहे. मुंबई ते गोवा हे सुमारे ५९० किलोमीटर अंतर आहे. गुळगुळीत रस्ते कापत, आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य पाहत मुंबईहून गोव्याला रोडने जाणे खूपच आनंददायी असू शकते. मुंबईतून निघाल्यापासून गोव्याला पोहोचण्यासाठी १० ते ११ तास लागू शकतात. मात्र, या रोड ट्रिपदरम्यान डोळ्यांना सुखावणारे निसर्गाचे विहंगम दृश्य पाहून मनाला विशेष आनंद मिळतो. याशिवाय अधे मध्ये अनेक फूड पॉईंट्स आहेत. त्यामुळे जाताना भूक लागली तर त्याचीही चिंता मिटेल.
2. दिल्ली ते अल्मोडा
पावसाळ्याच्या दिवसात डोंगरी भागांचे सौंदर्य अनेक पटीने वाढते. पण अशा अनेक भागात दरड कोसळण्याचा धोका असतो. ज्यामुळे अशा ठिकाणी जाणे धोकादायक ठरू शकते. असे असले तरीही तुम्हाला जर योग्य मार्गांची माहिती असेल तर अशा ठिकाणी जाणे तुमच्यासाठी सोपे होऊ शकते. (Road Trip) असा एक सुंदर रस्तेप्रवास करायचा असेल तर दिल्ली ते अल्मोडा असा प्रवास नक्की करा. दिल्ली ते अल्मोडा हे अंतर सुमारे ३७० किलोमीटर इतके आहे. पावसाळ्यात येथील रस्त्यांच्या आजूबाजूला हिरवळ असते आणि दिल्ली ते अल्मोडा या रोड ट्रिपमध्ये लागणारे भीमताल, लॅन्सडाउन, कासारदेवी मंदिर देखील पाहण्यासारखे आहे.
3. दार्जिलिंग ते गंगटोक
जर तुम्हाला पावसाळ्यात एक भन्नाट रोड ट्रिप करायची असेल तर दार्जिलिंग ते गंगटोक हा रस्तेप्रवास तुमच्यासाठी अत्यंत आनंददायी ठरू शकतो. पावसाळ्यात दार्जिलिंगला जाणे यापेक्षा सुखद आणखी काय असू शकते? कारण, या सीझनमध्ये दादार्जिलिंग ते गंगटोक फिरायला जी मजा येते ती इतर कोणत्याच रस्ते प्रवासात येत नाही. (Road Trip) म्हणूनच पावसात तुम्ही दार्जिलिंग ते गंगटोक अशी रोड ट्रिप प्लॅन करू शकता. या दोन्ही ठिकाणांमध्ये सुमारे १०० किलोमीटर इतके अंतर आहे. हा प्रवास तुम्ही NH10 वरून केला असता अवघ्या ४ तासांचा वाटतो.
4. उदयपूर ते माउंट अबू
पावसाळ्याच्या दिवसात भेट देता येईल असे सुंदर ठिकाण म्हणजे राजस्थानमधील उदयपूर. त्यातही तुम्हाला जर सुंदर रस्ते प्रवासाचा आनंद लुटायचा असेल आणि सुरक्षित व मजेशीररित्या प्रवास करायचा असेल तर उदयपूर ते माउंट अबू एक बेस्ट रोड ट्रिप ठरेल. उदयपूर हे शहर तलावांसाठी प्रसिद्ध आहे. (Road Trip) ज्यात माउंट अबू हे राजस्थानचे एकमेव हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात इथला रस्ता नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असतो. त्यामुळे प्रवासादरम्यान एक वेगळाच हर्ष प्राप्त होतो.
5. बंगळुरु ते कुर्ग
पावसाळ्यात लॉन्ग ड्राइव्ह करायची असेल तर बंगळुरु ते कुर्ग एक भन्नाट रोड ट्रिप होऊ शकते. या दोन्ही ठिकाणांमध्ये सुमारे २६५ किलोमीटर इतके अंतर आहे. इथला रस्ता पावसामध्ये प्रवासासाठी चांगला, सुरक्षित आणि सोयीचा आहे. (Road Trip) शिवाय या रोड ट्रीपदरम्यान अनेक निसर्गरम्य दृश्ये दिसतात. जी पाहून अनोखा आनंद मिळतो.