जिल्ह्यातील रस्त्यांचे काम दोन ते तीन वर्षांपासून ठप्प

road
road
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : सध्या नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे राजकारण पेटलेले आहे. परंतु या राजकीय आरोप -प्रत्यारोपांच्या धुराळ्यात शहरातील अनेक रस्त्यांची कामे ठप्प झालेली आहेत. या प्रकरणी दळणवळण मंत्री नितिन गडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसैनिकांमुळे रस्त्यांची कामे खोळंबली असून त्यांना आवर घाला अशी सूचना दिली आहे. अडकून पडलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. त्याचबरोबर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना त्यांचा जीवही गमवावा लागतो.

गेल्या चार वर्षापासून औरंगाबाद ते जळगाव रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदार बदलून देखील या कामाला गती आलेली नाही. तसेच औरंगाबाद ते धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून आतापर्यंत औरंगाबाद ते कन्नड कन्नड रस्त्याचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. औरंगाबाद ते शिर्डी हा तिसगाव मार्गे जाणारा रस्ता जाणाऱ्या रस्त्याचे काम अजूनही हाती घेतले नसून औरंगाबाद ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम आठ वर्षापासून रखडलेले आहे. 350 कोटीतून हा रस्ता उभा करण्यात येणार होता. यानंतर एनएचएआयएने 900 कोटींच्या निधीतून काम करण्याच्या अनुषंगाने रस्त्याच्या डीपीआर चे काम हाती घेतले पण अजूनही या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागलेला नाही.

‘जळगाव रस्त्याचे तीन ते चार वर्षापासून काम सुरू असून शिवसेनेच्या नेत्यांनी कंत्राटदारांना मदत केली. परंतु भाजपच्या नेत्यांच्या त्रासाला आणि भीतीला त्रस्त होऊन कंत्राटदार काम सोडून गेले असून पैठण रोडचा तर काय घोळ सुरु आहे. हे शासनालाच माहीत आहे.’ असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले. ‘केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र न लिहिता जीएसटीच्या थकलेल्या रक्कमे संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहावे. यामुळे राज्यातील ठप्प पडलेली कामे काही प्रमाणात का होईना सुरळीत चालतील. राजकीय आरोप करण्यात काहीही फायदा नसून रस्त्याची कामे पैशांअभावी थांबलेली आहेत’ असे काँग्रेस प्रदेश सचिव सुमेध निमगावकर म्हणाले.