Robot Commits Suicide | जीवाला कंटाळून चक्क रोबोटने केली आत्महत्या; दक्षिण कोरियातून धक्कादायक प्रकार समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Robot Commits Suicide | प्रत्येक माणसाला भावभावना असतात. त्यामुळेच मानव प्राणी हा इतर पृथ्वीवरील इतर सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. माणूस कधी खुश असतो तर कधी नाराज असतात. अनेकवेळा आयुष्यात कुठलाही मार्ग न दिसल्याने माणूस आत्महत्या सारखे चुकीचे पाऊल उचलतो. माणसाप्रमाणे दिसणाऱ्या माणसाप्रमाणे हालचाल करणाऱ्या आणि काम करणारे आजकाल रोबोट देखील आहेत. रोबोट हा माणसाप्रमाणे सगळी काम करू शकतो. पण रोबोटला भावभावना नाही. परंतु अशातच एक धक्कादायक खुलासा झालेला आहे ज्यामुळे तुम्हाला नक्कीच वाटेल की रोबोटला देखील भावना आहेत.

दक्षिण कोरियातून एक प्रकार समोर आलेला आहे. जिथे एका रोबोटने(Robot Commits Suicide) चक्क पायऱ्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. रोबोटला भावना नसतात. परंतु या घटनेने संपूर्ण जग हादरले आहे. ही बातमी सोशल मीडियावर देखील चांगलीच व्हायरल होत आहे.

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियाच्या गुमी सिटी कौन्सिलमध्ये सिव्हिल सर्व्हंट म्हणून काम करणारा हा रोबोट ‘रोबोट सुपरवायझर’ या नावाने ओळखला जात होता. त्याने लोकांना मदत केली आणि कर्मचाऱ्यांमध्ये तो खूप लोकप्रिय होता. मात्र, त्याच्या ‘आत्महत्या’ची घटना रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे, विशेषत: एखादे मशीनही आत्महत्येसारखे पाऊल उचलू शकते.

सुरुवातीच्या वृत्तानुसार, रोबोट रहस्यमयपणे त्याच ठिकाणी फिरताना दिसला. यानंतर तो दोन मीटर उंच शिडीवरून खाली पडला. त्यानंतर त्याची सर्व यंत्रणा कोलमडली. या घटनेनंतर रोबोटच्या ‘मृत्यू’च्या कारणांचा शोध घेण्यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. स्थानिक मीडियाने या घटनेचे वर्णन देशातील पहिली ‘रोबोट आत्महत्या’ असे केले आहे.

सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच लोकांनी सर्व प्रकारची चर्चा सुरू केली. एका यूजरने लिहिले आहे की, कामाच्या बोजामुळे मशिन्सनेही आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. तर इतर म्हणतात, रजा नाही, भत्ते नाहीत, अगदी रोबोटला युनियनची गरज आहे. आणखी एका युजरने कमेंट केली आहे, या घटनेने हे सिद्ध होते की रोबोट्स अजूनही माणसांप्रमाणे निर्णय घेण्यास आणि परिस्थिती समजून घेण्यास सक्षम नाहीत.