Friday, January 27, 2023

BCCI ला मिळाले नवे अध्यक्ष; ‘या’ दिग्गज खेळाडूची वर्णी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची निवड झाली आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM), रॉजर बिन्नी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी दिग्गज खेळाडू सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष होते.

रॉजर बिन्नी यांच्याशिवाय उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला, सचिवपदी जय शहा, कोषाध्यक्षपदी आशिष शेलार, सहसचिवपदी देवजित सैकिया आणि आयपीएल अध्यक्षपदी अरुण धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

कोण आहेत रॉजर बिन्नी –

रॉजर बिन्नी हे पहिले अँग्लो-इंडियन क्रिकेटपटू आहे. १९७९ ते १९८७ मध्ये त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व आहे. त्यांनी २७ कसोटी सामन्यात ८३० धावा केल्या आहेत. तर ७२ एकदिवसीय सामन्यात ६२९ धावा केल्या आहेत. रॉजर बिन्नीने २७ कसोटीमध्ये ४० विकेट्स घेतल्या आहेत तर एकदिवसीय सामन्यात 77 विकेट्स घेतल्या आहेत. रॉजर बिन्नी यांचा १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होते. १९८३ विश्वचषक स्पर्धेत त्यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.