मुलगी असावी तर अशी; लालूंना किडनी देऊन रोहिणीनं निभावलं कर्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन आज सिंगापूरमध्ये यशस्वीरित्या पार पडले. लालू यांना त्यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी आपली किडनी दिली आहे. सध्या लालूप्रसाद यादव आणि मुलगी रोहिणी या दोघांचीही तब्ब्येत ठीक आहे.

याबाबत आरजेडी नेता आणि लालूंचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. पप्पांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर त्यांना ऑपरेशन थिएटरमधून आयसीयूमध्ये हलवण्यात आले. मोठी बहीण रोहिणी आचार्य आणि लालूप्रसाद यादव दोघेही आता निरोगी आहेत. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद असं त्यांनी म्हंटल आहे.

रोहिणी आचार्य या आधीच प्राथमिक वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यांची किडनी सध्या ९० ते ९५ टक्के काम करत आहे. लालू यादव यांच्या दोन्ही किडन्या 28 टक्के काम करत आहेत. प्रत्यारोपणानंतर, ते सुमारे 70 टक्के काम करण्यास सुरवात करेल. आरोग्याच्या दृष्टीने एवढे पुरेसे मानले जाते.

लालू यादव हे सात मुलांचे वडील आहेत. ते आपल्या मुलीला अडचणीत कसा टाकू शकतो? किडनी प्रत्यारोपणाशिवाय दुसरा मार्ग नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्यावर संपूर्ण लालू परिवार गोंधळून गेला. रोहिणी आचार्य यांनी किडनी दान करण्याची ऑफर दिली तेव्हा लालू यादव यांनी नकार दिला. रोहिणीने खूप समजावून सांगितल्यानंतर वडील लालू यादव यांनी होकार दिला आणि किडनी स्वीकारण्यास सहमती दर्शवली.