Rohit Pawar ED Enquiry : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे आज ED कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. रोहित पवार यांनी चौकशीसाठी जाण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी शरद पवारांनी त्यांना यशवंतराव चव्हाण यांचे एक पुस्तक दिले ते पुस्तक घेऊनच रोहित पवार ED कार्यालयात दाखल झाले.
बारामती ऍग्रो (Baramati Agro) कंपनी प्रकरणी आज रोहित पवारांची ED चौकशी होणार (Rohit Pawar ED Enquiry) असल्याने सकाळपासुनच कारकर्त्ये मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले होते आणि रोहित पवारांना आपलं समर्थन देत होते. त्यातच शरद पवार हे सुद्धा सिल्वर ओक वरून राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाले होते त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अंगात बळ आलं. शरद पवार यांनी नेहमीच रोहित पवारांना ताकद दिली आहे. त्यामुळे रोहित पवारांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य विधानभवनात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. आणि पक्षाच्या प्रदेश कार्यालयात जाऊन शरद पवारांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पवारांनी रोहित पवार यांना यशवंतराव चव्हाण यांचं पुस्तक भेट म्हणून दिलं. त्यानंतर रोहित पवार आपल्या आत्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत ईडी कार्यालयात दाखल झाले.
रोहित पवार काय म्हणाले? Rohit Pawar ED Enquiry
ED कार्यालयात चौकशीसाठी जाण्यापूर्वी (Rohit Pawar ED Enquiry) रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी एक मराठी माणूस आहे त्यामुळे मी घाबरणार नाही. यापूर्वी ईडी अधिकाऱ्यांनी जी काही कागदपत्रं मागितली होती ती आम्ही दिली आहेत. तरीही आमच्या चौकशीमागे कोणती शक्ती आहे हे सांगता येणार नाही असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला. आज आम्ही सामान्य व्यक्तींच्या वतीने एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात आवाज उठवत आहोत. कदाचित त्यामुळेच ही कारवाई असावी असं लोकांचं मत आहे, असं रोहित पवार म्हणाले. चूक केली नसेल तर घाबरायचं कारण काय असा सवालकरत आपण घाबरणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं.