साताऱ्यात तुतारी Vs कमळ की घड्याळ? रोहित पवारांचं महत्वाचे भाष्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही कडून मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यात गेल्या काही वर्षात बदललेल्या राजकीय समीरणानंतर प्रथमच लोकसभा निवडणूक होत असल्याने यंदाची निवडणूक अटीतटीची होणार आहे. वेगवेगळ्या युती आणि आघाड्या असल्याने जागावाटपाचा तेढ अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. असाच एक मतदारसंघ म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा मतदारसंघ (Satara Lok Sabha) … मात्र याच मतदारसंघात नेमकी कोणत्या २ पक्षात थेट लढत होईल याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महत्वाचे भाष्य केलं आहे.

खरं तर यापूर्वी आघाडीत सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असायचा. श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) हे सध्याचे साताऱ्याचे विद्यमान खासदार आहेत. मात्र २०१९ निवणुकीत युतीमध्ये हि जागा भाजपने लढवली होती. आता परिस्थिती वेगळी आहे. श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांच्या गटात आहेत. तर अजित पवार हे भाजपसोबत गेल्याने ते सुद्धा सातारा लोकसभा मतदार संघावर दावा सांगण्याची शक्यता आहे. त्यामुळे साताऱ्यात शरद पवारांच्या तुतारी विरोधात भाजपचे कमळ पाहायला मिळणार कि अजितदादांच्या घड्याळाचा उमेदवार असणार याकडे मतदारांचे लक्ष्य आहे. मात्र साताऱ्यात तुतारी विरुद्ध भाजप असाच सामना पाहायला मिळेल असं महत्वाचे विधान रोहित पवार यांनी केलं.

विधानभवन परिसरात बोलताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, उदयनराजे जर भाजप सोडून घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असतील तर वेगळी गोष्ट आहे. तस झाल्यास ते आगामी काळात समजेलच कि उदयनराजे नेमकं कोणाच्या चिन्हावर लढतील … परंतु जो काही आम्हाला अनुभव आहे ते पाहता उदयनराजे घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही. त्यामुळे तुतारी म्हणजे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना साताऱ्यात होण्याची शक्यता आहे असं मत रोहोत पवारांनी व्यक्त केलं आहे.