दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात; तरुणांच्या प्रश्नांना फुटणार वाचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज संपूर्ण महाराष्ट्रात दसरा सण साजरी केला जात आहे. आजच्या या शुभ मुहूर्तावर तरुणांचे विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादचे नेते आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेलाही सुरुवात झाली आहे. आज पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून रोहित पवारांनी पुणे ते नागपूर अशा 800 किमीच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे. या यात्रेदरम्यान रोहित पवार राज्यातील तरुणांचे प्रश्न जाणून घेतील आणि या सर्व प्रश्नांना येत्या हिवाळी अधिवेशनात सरकार पुढे मांडतील.

गेल्या काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा निघणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे टिळक स्मारक मंदिरात उपस्थित सर्व तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत. या यात्रेची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले वाडा, लाल महाल येथून पदयात्रेला सुरुवात होऊन पुढे आप्पा बळवंत चौक, पत्र्या मारुती चौक, पेरू गेट, गांजवे चौक, नवी पेठ अशा मार्गे झाली आहे.

दरम्यान, युवा संघर्ष पदयात्रेमध्ये रोहित पवार दिवसाला 23 किलोमीटर चालतील. युवा संघर्ष यात्रेचे अंतर 820 किमी इतके असणार आहे. शेवटी ही यात्रा नागपूर येथे संपवण्यात येईल. राज्यातील बेरोजगार तरुण, स्पर्धा परीक्षा करणारे युवक, डिग्री असूनही काम नसलेले विद्यार्थी तसेच आर्थिक अडचणीत सापडलेले विद्यार्थी अशा सर्व प्रश्नांची वाचा फोडण्याचे काम रोहित पवार युवा संघर्ष यात्रेतून करतील. ही यात्रा आजपासून 13 जिल्ह्यामध्ये प्रवास करेल. या यात्रेत कोणाला ही सहभागी होण्याची मुभा असेल.