Rohit Sharma : रोहित शर्माची ट्रिपल सेंच्युरी; IPL मध्ये रचला इतिहास

Rohit Sharma
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rohit Sharma। मुंबई इंडियन्सची आन बाण आणि शान हिटमॅन रोहित शर्माने गुजरात विरुद्वच्या एलिमिनेटर सामन्यात तब्बल 5 विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहेत. रोहित शर्मा आयपीएल इतिहासात ३०० पेक्षा जास्त सिक्स मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेच ८० पेक्षा जास्त धावा करणारा सर्वात वयस्कर खेळाडू तो ठरला आहे. गुजरात विरुद्धच्या कालच्या सामन्यात रोहितने ५० चेंडूत ८१ धावांची वादळी खेळी खेळली. यादरम्यान त्याने ९ चौकार आणि ४ षटकार ठोकले. आपल्या या खेळीत रोहितने अनेक नवीन रेकॉर्ड बनवले.

रोहितने केले खालील विक्रम- Rohit Sharma

१) रोहित आयपीएल प्लेऑफमध्ये ८० पेक्षा जास्त धावा करणारा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू ठरला आहे. सध्या रोहितचे वय ३८ वर्षे आणि ३० दिवस आहे. रोहितने यादरम्यान चेन्नई सुपर किंगच्या मायकल हसीला मागे टाकलं. २०१३ मध्ये आयपीएल क्वालिफायर-१ मध्ये हसीने मुंबई इंडियन्सविरुद्ध ८६ धावांची नाबाद खेळी केली. तेव्हा हसीचे वय ३७ वर्षे आणि ३५९ दिवस होते.

२) रोहित शर्माने (Rohit Sharma) आयपीएल मध्ये आत्तापर्यंत २७१ सामन्यांमध्ये ३०२ षटकार मारले आहेत. आयपीएल इतिहासात ३०० षटकार मारणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तर एकूण यादीत बघितलं तर रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल त्याच्या पुढे आहे. गेलने आयपीएलमध्ये १४२ सामन्यांमध्ये ३५७ षटकार ठोकलेत.

३) प्लेऑफ सारख्या करो वा मरो सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज म्हणून रोहित शर्माने नाव कमवलं आहे. याबाबतीत त्याने सूर्यकुमार यादवला मागे टाकलं. सूर्यकुमार यादवने २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या क्वालिफायर-१ मध्ये नाबाद ७१ धावा केल्या होत्या. मात्र रोहितने काल ८१ धावा करत सूर्याचा रेकॉर्ड ब्रेक केला.

४) रोहित आयपीएल प्लेऑफमध्ये सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. हा रेकॉर्ड अजूनही माजी भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे. कुंबळे ३८ वर्षे आणि २१९ दिवसांच्या वयात प्लेऑफमध्ये सामनावीर ठरले होते.

५) एकाच संघाकडून खेळताना सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीत रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्या क्रमांकावर पोचला आहे.. मुंबई इंडियन्स साठी रोहित शर्माने २३५ सामन्यात २६७ षटकार मारले आहेत. त्याने यादरम्यान आरसीबी कडून खेळलेल्या ख्रिस गेलचा रेकॉर्ड तोडला. सध्या या यादीत पहिल्या स्थानावर विराट कोहली आहे. विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर बंगळुरू साठी आत्तापर्यंत २६६ आयपीएल सामने खेळले असून त्याच्या नावावर २९१ षटकार आहेत.