Rohit Sharma : रोहित शर्माचा मोठा कारनामा; कसोटीमध्ये पार केला 4000 धावांचा टप्पा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Rohit Sharma : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने मोठा कारनामा केला आहे. रोहितने कसोटी क्रिकेट मध्ये ४००० धावांचा टप्पा पार केला आहे. काल भारताच्या दुसऱ्या डावात २१ धावा करताना रोहितने हा माईलस्टोन गाठला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये चार हजार धावा पूर्ण करणारा तो १७वा भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहितने ५८ व्या कसोटीत हा रेकॉर्ड केला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत पहिल्या डावात रोहित शर्माला (Rohit Sharma) केवळ दोन धावा करता आल्या होत्या. यानंतर, त्याने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर तो 24 धावा करून अजूनही मैदानावर उभा आहे. यावेळी रोहितने 21 धावा करताच कसोटी क्रिकेटमधील 4000 धावा पूर्ण केल्या. रोहित नेहमीच आपल्या आक्रमक फलंदाजी साठी ओळखला जातो. रोहित शर्मा सर्वात जलद चार हजार धावा करणारा 10वा भारतीय फलंदाज आहे. रोहितने आपल्या कारकिर्दीतील कसोटी क्रिकेटच्या 100 व्या डावात ४००० धावांचा आकडा गाठला आहे.

कशी आहे रोहितची कसोटी कारकीर्द – Rohit Sharma

खरं तर आपल्या आक्रमकतेसाठी प्रसिद्ध असलेला रोहहित हा वन डे स्टाईल फलंदाज आहे. मात्र कसोटी क्रिकेट मध्येही त्याने आपला चांगला जम बसवला आहे. रोहित शर्माने २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले होते. त्याने पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये शतके झळकावली. आतापर्यंत रोहितने भारताकडून 58 कसोटी सामने खेळला आहे. यामधील 100 डावात त्याने 4003 धावा केल्या आहेत. यामध्ये 11 शतके आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे.