हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रोहित दुसऱ्यांदा पिता बनल्याचा माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. त्याची पत्नी रितिका सजदेहने एका मुलाला जन्म दिला आहे. चाहत्यांनी रोहित आणि रितिकाबद्दल सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र, अजून रोहित किंवा रितिका यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यासाठी विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडू ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. पण रोहित अजून गेलेला नाही. रोहितने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे रजेची विनंती केल्याची बातमी होती. आता मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की रितिकाने मुलाला जन्म दिला आहे. मात्र रोहितने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
रोहित आणि रितिका यांचे 2025मध्ये लग्न झाले होते. डिसेंबर 2018 मध्ये रितिकाने एका मुलीला जन्म दिला. मुलीचे नाव समायरा. रोहित आणि रितिका यांची लव्हस्टोरी ही खूप रंजक आहे. हाती आलेल्या माहितीनुसार रितिका याआधी रोहितची मॅनेजर होती. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. रोहित आणि रितिका यांनी नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणार आहे. सर्व काही ठीक झाले तर रोहित या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचू शकतो.