हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । नुकतंच भारतीय क्रिकेट संघाला T20 विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) संपूर्ण जगात चर्चा सुरु आहे. जिथे जाईल तिथे रोहितचे कौतुक केलं जात आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि दिलदार स्वभावाने रोहित सर्वानाच हवाहवासा वाटतो. सध्या रोहित शर्मा काही दिवस आराम करत आहे. मात्र आपला हा वेळ तो इंग्लडमध्ये घालवत आहे. सचिन तेंडुलकरच्या पाऊलावर पाऊल ठेवत रोहित शर्माही विम्बल्डनचे सामने बघायला इंग्लंडला गेला (Rohit Sharma At Wimbledon) आहे. रोहित शर्माचे सूट- बुटातील फोटो सुद्धा व्हायरल झाले आहेत. मुंबईचा हा राजा विम्बल्डनच्या मैदानातही आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.
स्टेडियममध्ये बसून टेनिस मॅचचा आनंद लुटला – Rohit Sharma At Wimbledon
रोहित शर्माने सेंटर कोर्टवर कार्लोस अल्काराज आणि डॅनिल मेदवेदेव यांच्यातील सेमी फायनलचा सामना पाहिला. आकर्षक असा सूट, गळ्यात टाय आणि काळा गॉगल घातलेला रोहित एखाद्या हिरो प्रमाणे दिसत होता. रोहितने स्टेडियममध्ये बसून टेनिस मॅचचा (Rohit Sharma At Wimbledon) आनंद लुटला. विम्बल्डनं देखील त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवरुन रोहितचं स्वागत केलं. रोहित शर्माला क्रिकेट शिवाय टेनिस आणि फ़ुटबाँल या २ खेळांची आवड आहे, त्यामुळे त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा तो टेनिस आणि फ़ुटबाँलचे सामंत बघत असतो.
दरम्यान, रोहित शर्मा च्या नेतृ्त्त्वात टीम इंडियानं 2024 चा टी 20 वर्ल्ड कप जिंकला. दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टीम इंडियानं इतिहास रचला. भारताने वर्ल्डकप जिंकताच संपूर्ण देशाने रोहितला अक्षरशा डोक्यावर घेतलं. मुंबईत सुद्धा रोहित शर्माकडे बघूनच लाखोंचा जनसमुदाय टीम इंडियाच्या स्वागतासाठी गोळा झाला होता. मुंबईचा राजा रोहित शर्मा हा गजर वानखेडे आणि मरीन ड्राइव्ह परिसरात दुमदुमत होता. रोहितने सध्या आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र वनडे आणि कसोटी क्रिकेट तो खेळत राहणार आहे. त्याचे आगामी लक्ष्य पुढील वर्षी होणारी चॅम्पियन ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन शिपअसेल.