म्हेवण्याच्या लग्नात रोहितचा जबरदस्त डान्स; पत्नी रितिकासोबत लगावले ठुमके (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा तसा शांत स्वभावाचा आहे. इतर खेळाडूंच्या तुलनेत रोहितचा शांत स्वभाव नेहमीच त्याच वेगळेपण सिद्ध करतो. आत्तापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर युजवेंद्र चहलचा खोडकरपणा पाहिला असेल तर कधी विराट कोहलीचा डान्स बघितला असेल. पण आता यामध्ये रोहीतसुद्धा काही मागे नाही. याचे कारण म्हणजे रोहितने नुकतंच सोशल मीडियावर एक विडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो कुटुंबासोबत दमदार डान्स करता दिसत आहे.

कधीचा आहे Video –

रोहित शर्माने नुकतेच आपल्या म्हेवण्याच्या लग्नात हजेरी लावली. या लग्नात त्याने आपल्या कुटुंबासोबत मनसोक्त एन्जॉय केला. यावेळी त्याने या लग्नात पती रितिका सोबत डान्स सुद्धा केला. रोहितने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये रोहितने तपकिरी रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे. आधी तो रितिकसोबत डान्स करताना दिसत आहे तर नंतर मुलगी समैरा सोबत मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडिओ खाली रोहितने वाईब हे असं कॅप्शन दिले आहे. रोहितचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना मात्र खूप आवडला आहे.

https://www.instagram.com/reel/CqLM0LsJunQ/?utm_source=ig_embed&ig_rid=2cf2b4d8-c7b7-4e15-a2ad-b0f4d5dbdae6

दरम्यान, येत्या 31 मार्चपासून आयपीएल सुरू होणार आहे. आयपीएल मध्ये रोहित शर्मा मुंबईचे नेतृत्त्व करत असून आत्तापर्यंत त्याने तब्बल 5 वेळा मुंबईच्या संघाला चॅम्पियन केलं आहे. मात्र मागील वर्ष मुंबई इंडियन्स आणि रोहीत शर्मासाठी अतिशय खराब गेलं. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यासाठी रोहित शर्मा सज्ज असेल.