“मुंबईचा राजा रोहित शर्मा” भर मैदानातच चाहत्यांनी हार्दिकला चिडवलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL मध्ये कालच्या गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात (GT Vs MI Match) मुंबईचा नवा कर्णधार हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) रोहित शर्माच्या चाहत्यांची (Rohit Sharma) चांगलाच निशाणा साधला. हार्दिक पंड्या टॉस साठी मैदानात उतरताच प्रेक्षकांकडून रोहित!! रोहित!! मुंबईचा राजा रोहित शर्मा अशी घोषणाबाजी करत हार्दिकला चिडवण्यात आले. याबाबतचा विडिओ सुद्धा व्हायरल होत आहे. रोहित रोहितच्या नाऱ्यानंतर हार्दिकचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

चाहत्यांना राग का??

खरं तर मुंबईच्या चाहत्यांना रोहित शर्मा हा देवासारखा आहे. आत्तापर्यंत मुंबई इंडियन्सला तब्बल ५ वेळा चॅम्पियन करणारा रोहित मुंबईकरांचा आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा लाडका आहे. मात्र यंदाच्या आयपीएल पूर्वीच मुंबईच्या संघाने रोहितला कर्णधार पदावरून काढून टाकत गुजरात मधून आलेल्या हार्दिक पंड्याच्या खांद्यावर धुरा दिली. हार्दिकमुळेच रोहितचे कर्णधारपद गेल्याची भावना रोहितच्या चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळेच रोहित प्रेमींकडून हार्दिक विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.

हार्दिकचे रोहितशी गैरवर्तन –

दरम्यान, गुजरात विरुद्धच्या सामन्यात हार्दिकने रोहितसोबत गैरवर्तन केलं. मुंबईचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना हार्दिकने अनेकदा रोहितच्या फिल्ड पोझिशन मध्ये बदल केला. शेवटी शेवटी तर त्याने रोहितला थेट सीमारेषेवर उभं केले. हार्दिकच्या या अशा वागण्याने रोहितच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.खरं तर रोहित शर्माला आपण नेहमीच ३० यार्ड सर्कलच्या आत क्षेत्ररक्षण करताना बघितलं आहे. परंतु गुजरात विरुद्धच्या कालच्या सामन्यात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. हार्दिक पंड्याने रोहितला सीमारेषेवर उभा केला. एवढच नव्हे तर डावाच्या अखेरच्या काही षटकात तर हार्दिक सतत रोहितची फिल्ड पोझिशन बदलत होता, रोहितला पण यावर विश्वास बसत नव्हता, त्यामुळे रोहित त्याला विचारत होता की मला पाठवत आहेस का? त्यानंतर रोहितलाही समजलं हार्दिक त्यालाच सीमारेषेवर जायला सांगत आहे. रोहित काहीही न बोलता बॉण्ड्रीवर गेला