Rohit Sharma : मुंबईच्या राजाने शब्द पाळला; रोहितने चाहत्याला दिली स्वतःची लॅम्बोर्गिनी

Rohit Sharma Lamborghini
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचा राजा म्हणून ज्याला ओळखलं जाते त्या रोहित शर्माने (Rohit Sharma) पुन्हा एकदा आपला दिलदारपणा दाखवला आहे. रोहितने त्याची ४ कोटींची लॅम्बोर्गिनी कार ड्रीम ११ फँटसी कॉन्टेस्टच्या विजेत्याला भेट दिली आहे. युवराज वाघ असं सदर युवकाचे नाव आहे. निळ्या रंगाची हि लॅम्बोर्गिनी आहे जिच्यासोबत रोहित अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसला आहे. मात्र आता हीच कार युवराजला देऊन रोहितने आपल्या मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा दाखवला आहे. रोहितचा कार देतानाचा विडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आयपीएल २०२५ हंगामात ड्रीम ११ ने एक विशेष स्पर्धा जाहीर केली होती, ज्यामध्ये रोहितने आपली लॅम्बोर्गिनी उरूस बक्षीस म्हणून देण्याचे वचन दिले होते. याची घोषणा त्याने १५ मार्च २०२५ रोजी एका जाहिरातीद्वारे केली होती, ज्यामध्ये तो आपली कार देण्याच्या कल्पनेने मजेशीरपणे रडताना दिसला होता. दुसऱ्या एका जाहिरातीत, एक चाहता लॅम्बोर्गिनी चालवताना दिसतो तर रोहित ऑटोरिक्षातून घरी जाताना दिसतो. या जाहिरातीनंतरच चाहत्यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) खरोखरच त्याची गाडी भेट देईल का याचा अंदाज लावायला सुरुवात केली. अखेर मुंबईच्या राजाने आपले वचन पूर्ण केले आणि युवराज वाघ नावाच्या युवकाला लॅम्बोर्गिनी भेट दिली.

Rohit Sharma – रोहितने मार्च 2022 मध्ये खरेदी केली होती लॅम्बोर्गिनी

लॅम्बोर्गिनी उरूस ही कार रोहितने मार्च २०२२ मध्ये ३.१५ कोटी रुपये (एक्स-शोरूम) किमतीला खरेदी केली होती. लॅम्बोर्गिनीचा नोंदणी क्रमांक २६४ आहे. रोहितने इडन गार्डन मैदानावर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात २६४ धावांची खेळी खेळली होती, त्यामुळेच त्याने आपल्या गाडीच्या नंबर प्लेटवर २६४ नंबर टाकला होता. मात्र आता त्याने हि कार ड्रीम ११ फँटसी कॉन्टेस्टच्या विजेत्याला भेट दिली. युवराज सोबत रोहितने फोटोही काढले आणि लॅम्बोर्गिनीची चावी युवराज कडे सुपूर्द केली. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर, विशेषतः एक्सवर, मोठ्या प्रमाणात शेअर झाले. अनेकांनी रोहितच्या या उदार कृतीचे कौतुक केले, आणि त्याला “हिटमॅन” ऐवजी “हार्टमॅन” असे म्हंटले .

दरम्यान, आयपीएल २०२५ मध्ये सुरुवातीच्या अपयशानंतर रोहित शर्मा चांगलाच फॉर्मात आला आहे. रोहित लयीत आल्यानंतर मुंबई इंडियन्स ची गाडीही विजयी ट्रॅकवर आली आहे. मुंबईचा संघ पॉईंट टेबल वर चौथ्या क्रमांकावर आहे. प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी मुंबईला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील.